

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर घडला भीषण अपघात
IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू
लोणावळा परिसरात घडला अपघात
गुढीपाडव्याच्या दिवशीच मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघाताची दुर्घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात घडलाय. लोणावळ्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघातात IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे मृत तरुणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तिन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. ओमकुमार बोरसे (२३, नाशिक), लय (२२, नागपूर), श्रेयंश शर्मा(२२, जयपूर) अशी तिन्ही मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही पुण्याहून मुंबईला निघाले होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या नवीन बोगद्याजवळ अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खोपोली एक्झिटजवळील नव्या बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातात ५ गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. तीन ते चार जण किरकोळ जखमी झालेत.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, कंटेनर आणि टँकरचा समावेश आहे. अपघातानंतर आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनमार्फत मदत कार्य सुरू केले.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, कार अतिवेगात होती. त्यावेळी भरधाव कारवर अवजड वाहन कोसळलं. यात कारचा चेंदामेंदा झाला. तर कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.