Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

Kopri-Pachpakhadi Assembly Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray NewsSaam TV
Published On

ठाणे : आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीवर भर दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरी पाचपाखाडीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Eknath shinde Vs uddhav thackeray
CM Eknath Shinde: संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासल्या, पाहा VIDEO

आज सोमवारी प्रचाराची सांगता असल्याने ठाण्यातील कोपर पाचपाखाडी मतदारसंघातील युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे कार्यकर्ते अष्टविनायक चौक या ठिकाणी एकमेकांच्या समोर आले. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

Eknath shinde Vs uddhav thackeray
Thane News : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत पाल, ठाणे महानगरपालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.आज प्रचाराचाला काही तास शिल्लक राहिले असताना कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

ठाण्याच्या कोपरी परिसरातील अष्टविनायक चौक या ठिकाणी ही रॅली काढली. या वेळेस शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरातील राजकीय वातावरण तापलं. परंतु या ठिकाणी पोलीस असल्याने पुढील काही वेळात मोठा अनर्थ टळला.

Eknath shinde Vs uddhav thackeray
MVA vs BJP manifesto : आश्वासनांचा महापूर, महाविकास आघाडी आणि भाजपच्या जाहिरनाम्यात 'या' मुद्द्यांवरून रस्सीखेच

दरम्यान, आज सकाळपासून सुरु झालेल्या प्रचार रॅलीची सांगता पाच वाजता होणार आहे. आज मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आज मोटार सायकल रॅली काढण्यावर भर दिला आहे. दुपारच्या सुमारास ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक ठिकाणी झालेल्या घटनेनंतर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारीही सतर्क झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com