Diwali Pahat 2024 : दादर, ठाणे, डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाटचा जल्लोष; पाहा VIDEO

Viral Video : दिवाळी पहाटनिमित्त हजारो डोंबिवलीकर फडके रोडवर; फडके रोड तरुणाईने फुलला
Viral Video
Diwali Pahat 2024Saam TV
Published On

दिवाळी पहाट आणि फडके रोड हे समीकरण डोंबिवलीत दर दिवाळीला पाहायला मिळतं. दिवाळी सुरू होताच डोंबिवली नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना तरुणींनीना फडके रोडचे वेध लागतात. दिवाळीच्या दिवशी पहाटेच तरुण-तरुणी तसेच दाम्पत्याचे पाऊलं फडके रोडच्या दिशेने वळतात.

Viral Video
Diwali 2024: दिवे लावताना घ्या विशेष काळजी, अन्यथा

डोंबिवलीचे ग्रामदैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी पहाटनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात विविध सामाजिक संस्था राजकीय पक्षांकडून या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक मंडळ तसेच संस्थाकडून भव्य दिव्य रांगोळ्या देखील काढल्या जातात वर्ष गणिल दिवाळी पहाटचा उत्साह डोंबिवलीकरामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय.

आज देखील दिवाळीच्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये पहाटे फडके रोडवर हजारो तरुण-तरुणी आलेत. फडके रोड तरुणाईने फुलून गेलाय. सेल्फी पॉईंटवर फोटो काढताना दिसत आहेत. एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. फडके रोजवर गणेश मंदिर संस्थातर्फे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो डोंबिवलीकर फडके रोडवर आले आहेत.

ठाण्यात भव्य दिवाळी पहाटचे आयोजन

दिवाळीनिमित्त ठाण्यात तलाव पाली राम मारुती रोड या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येऊन दिवाळी पहाट साजरी करत असते. तर शुभेच्छा देत असतात गेल्या काही वर्षात प्रत्येक राजकीय पक्ष या दिवाळी पहाट कार्यक्रमचे आयोजन करतात आणि ठाणेकर या दिवाळी पहाटसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

दादर दिवाळी पहाट

दादर शिवाजी पार्क येथे सुगी परिवार तर्फे राहुल देशपांडे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आज मनसे उमेदावर अमित ठाकरे उपस्थित आहेत. थोड्या वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील येथे दाखल होणार आहेत.

Viral Video
Sushama Andhare News: ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी आहेत; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com