MVA vs BJP manifesto : आश्वासनांचा महापूर, महाविकास आघाडी आणि भाजपच्या जाहिरनाम्यात 'या' मुद्द्यांवरून रस्सीखेच

Mahalaxmi Yojana vs Ladka Bhau Yojana : 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपापले जाहीरनामे जाहीर केले, कुणाच्या जाहरनाम्यात काय ते पाहूयात..
MVA vs BJP manifesto
MVA vs BJP manifestoSaam TV
Published On

मुंबई : (MVA vs BJP manifesto) निवडणूकीचे बिगूल वाजल्यानंतर राज्यात आश्वासनांचा पूर आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्त्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे.  भाजप आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी काल रविवारी महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपापले जाहीरनामे जाहीर केले. भाजपने धर्मांतरविरोधी कडक कायदा आणि लाडकी बहिण योजनेंतर्गत मासिक भत्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले, तर महाविकास आघाडीने जात जनगणना, महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोन दिवसांची मासिक रजा आणि 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले. 

लाडक्या बहिणींवर भाजप उदार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत भाजपचे 25 सूत्री 'संकल्प पत्र' जारी करण्यात आले. जर पक्षाला पुन्हा सत्तेत आणले तर लाडकी बहिण योजना आणि ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 1 हजार 500 रूपये असलेला मासिक भत्ता 2 हजार 100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 

सत्तेत आल्यास महाविकास आघाडी महिलांना देणार महिना 3 हजार रूपये 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा 3 हजार रूपये देण्याच्या वचनाचा पुनरुच्चार करत, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईत 'महाराष्ट्रनामा' नावाचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात, महाविकास आघाडीने मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला दोन दिवसांची सुट्टी देण्याचे वचन दिले होते.  9-16 वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या कर्करोगाची लस देण्यात येणार असल्याचे सांगितले.

बिहार, केरळ आणि ओडिशामध्ये मासिक पाळीच्या रजेची तरतूद असताना, कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात सहा दिवसांची वार्षिक रजा लागू करण्याचा प्रस्ताव दिला. अलीकडेच, कर्नाटक कामगार विभागाने या प्रकरणावर संबंधितांकडून अभिप्राय मागवला.

300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांसाठी 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देण्याव्यतिरिक्त, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येकी 500 रुपये दराने वार्षिक सहा गॅस सिलिंडरची तरतूदही केली आहे.

अमित शाह यांनी व्यक्त केली आरक्षण जाण्याची भीती

एससी, एसटी आणि ओबीसी कोटा कमी करून मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देण्याची काँग्रेसची योजना आहे, असा दावाही शहा यांनी केला. वक्फ बोर्डावर चिंता व्यक्त करत शाह यांनी आरोप केला की, काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये वक्फ बोर्ड शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करत आहे. जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर, शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाकडून जबरदस्तीने संपादित केल्या जातील, अशी भीती अमित शाह यांनी व्यक्त केली.

Edited By- Nitish Gadge

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com