कल्याण स्टेशनवर संतापजनक प्रकार! स्ट्रेचर नाही, साडीमध्ये आजीला उचलून नेलं; रुग्णालयात पोहोचताच प्राण सोडले

Elderly Woman Died Due To No Stretcher At Kalyan Station: कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वयोवृद्ध महिलेला तब्येत बिघडल्यानंतर तासभर कोणतीही मदत मिळाली नाही.
Passengers carry an elderly woman in a saree at Kalyan railway station after no stretcher or medical help was available.
Passengers carry an elderly woman in a saree at Kalyan railway station after no stretcher or medical help was available.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण रेल्वे स्थानकात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयोवृद्ध महिलेला तब्येत बिघडल्यावर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, पोलीस आरपीएफ किंवा स्टेशन प्रबंधनच्या कोणीही उपलब्ध झाला नाही. इतकंच नाही तर साधा स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. साडीमध्ये टाकून प्रवाशांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केला. मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.

Passengers carry an elderly woman in a saree at Kalyan railway station after no stretcher or medical help was available.
बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

कल्याण रेल्वे स्थानकात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील सुनंदा दंडवते या वयोवृद्ध महिला उपचारासाठी कल्याणमध्ये आल्या होत्या. उपचारानंतर त्या पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत होत्या. दरम्यान, अचानक त्यांना फिट आला आणि त्या बेशुद्ध पडल्या. आजूबाजूच्या प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. काही प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

Passengers carry an elderly woman in a saree at Kalyan railway station after no stretcher or medical help was available.
Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जवळपास एक तास मदतीसाठी कोणीही उपलब्ध झाले नाही. साधा स्ट्रेचरही स्टेशनवर नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.अखेर, परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून प्रवाशांनीच पुढाकार घेतला. रोहित दंडवते आणि आर्यन हुले या दोन तरुणांनी महिलेच्या बॅगमधील साडी काढून त्यातच त्यांना उचलून स्टेशनबाहेर नेले आणि जवळच्या क्लिनिकमध्ये दाखल केले.

Passengers carry an elderly woman in a saree at Kalyan railway station after no stretcher or medical help was available.
Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

मात्र, तिथेही काही काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंतर डॉक्टरांनी तपासून सुनंदा दंडवते यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच 108 ॲम्बुलन्स उशिराने आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा अशी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com