Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Marathi language rule for taxi drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. संजय निरुपम यांनी पुनर्विचाराची मागणी केली असून कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Marathi language rule for taxi drivers
Marathi language rule for taxi drivers Saam
Published On

संजय गडदे | मुंबई प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Marathi language rule, auto taxi drivers : राज्य सरकारकडून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता या मुद्द्यावर राजकीय आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

निरुपम यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, ऑटो-टॅक्सी चालकांकडून कामचलाऊ मराठी भाषेची अपेक्षा ठेवावी, मात्र भाषेची सक्ती लादू नये. अशा कठोर निर्णयामुळे हजारो चालकांच्या रोजीरोटीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Marathi language policy Maharashtra
Marathi language policy Maharashtra

पत्रात त्यांनी नमूद केले की, मुंबईसारख्या महानगरात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील चालक काम करतात. त्यांनी प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह उभा केला असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत भाषेची सक्ती केल्यास त्यांच्या रोजगारावर संकट येऊ शकते, तसेच मानसिक तणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते.

Marathi language rule for taxi drivers
रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

दरम्यान, या निर्णयाविरोधात कामगार संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. मित्र पक्षाशी संबंधित कामगार नेते शशांक राव यांनी ४ मे रोजी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता राजकीय व सामाजिक पातळीवरही तापताना दिसत आहे.

Marathi language rule for taxi drivers
Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

एकीकडे मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा मुद्दा पुढे केला जात असताना, दुसरीकडे रोजगाराचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारसमोर संतुलन साधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आता संजय निरुपम यांचे पत्र, वाढता विरोध आणि प्रस्तावित मोर्चा या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या निर्णयाबाबत माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Marathi language rule for taxi drivers
भीषण अपघात! आंबे घेऊन जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, नवरा-बायको अन् मुलाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com