रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

West Bengal election Voting: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 89.93% मतदान होऊन नवा विक्रम झाला आहे. ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील लढत अधिक रंगतदार बनली आहे.
West Bengal election Voting
West Bengal election VotingSaam
Published On

West Bengal Election 2026 Voting : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५२ विधानसभा मतदारसंघात तब्बल 89.93% मतदान झाल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघात २०२१ मध्ये ८१.१६ टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमधील मतदानाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येणार की भाजप डाव साधणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं?

दक्षिण दिनाजपूर 93.12% (सर्वात जास्त)

कूचबिहार 92.07%

बीरभूम 91.55%

मुर्शिदाबाद 91.36 %

जलपाईगुडी 91.20%

पश्चिम मेदिनीपूर 90.70%

झारग्राम 90.589%

उत्तर बँकुरा 90.583%

मालदा 89.56%

अलीपुरद्वार 88.74%

पूर्व मेदिनीपूर 88.55%

पुरुलिया 87.35%

पश्चिम वर्धमान 86.89%

दार्जिलिंग 86.49%

कालिम्पाँग 81.98% (सर्वात कमी)

West Bengal election Voting
Baramati Politics: 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार? रोहित पवारांच्या विधानावर जय पवारांचं स्पष्ट शब्दात उत्तर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. गुरूवारी १६ जिल्ह्यातील १५२ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. १४७८ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये थेट टक्कर असून ४४ हजार मतदान केंद्रावर मतदान पार पडले. ३ कोटींपेक्षा जास्त मतदारांनी हक्क बजावला आहे.

West Bengal election Voting
उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सुप्रिया सुळेनंतर काँग्रेसकडूनही मागणी

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार: अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालमधील एका निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले, "आज मतदानाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. ५ तारखेला ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल. बंगालमध्ये पूर्ण बहुमतासह भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. बंगालला घुसखोरांपासून मुक्त करण्यासाठी तुम्हा सर्वांनी कमळाचे बटण दाबलेच पाहिजे."

West Bengal election Voting
पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com