भीषण अपघात! आंबे घेऊन जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, नवरा-बायको अन् मुलाचा जागीच मृत्यू

Highway accident causes washim: वाशिम-मंगरूळपीर महामार्गावर पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
washim Accident
washim Accident Saam
Published On

मनोज जैयस्वाल, वाशिम प्रतिनिधी

Latest road accidents in Maharashtra Washim : वाशिममध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आंबे घेऊन जाणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ३ जणांचा मृत्यू झाला. वाशिम-मंगरूळपीर महामार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

वाशिम ते मंगरूळपीर महामार्गावर आज पार्डी टकमोर गावाजवळ आंबे वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनांने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले.

washim Accident
रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

वाशिमधील हा अपघात इतका भीषण होता की अपघात पिकअप वाहन रस्त्यावरून खाली शेतात पलटले. पिअकअपच्या चालकाला आणि अन्य एकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर पिकअपच्या धडकेत वारा देपुळ गावातील एकाच कुटंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

washim Accident
पुण्यात धक्कादायक घटना! हात बांधलेले अन् मृतदेह झाडाला लटकलेला; लष्कराच्या जवानासोबत नेमकं झालं काय?

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात दाखल केले.

washim Accident
मित्राच्या बायकोवर बलात्कार, बड्या अधिकार्‍याच्या मुलीची अब्रु लुटली; २३ वर्षाच्या नराधमाचा 'तो' भयानक प्लॅन उघड

मिळालेल्या माहितीनुसार वाशीम तालुक्यातील वारा जहागीर येथील रहिवासी संतोष लांभाडे (४०) पत्नी कलावतीबाई लांभाडे

(३५) व मुलगा ईश्वर लांभाडे (१२) यांचा अपघातात मृत्यू झाला. पार्डी टकमोर फाट्यावर चौफुलीवरून समोर जात असताना मंगरुळपीरकडून येणारे पीकअप हे वाहन मोटार सायकल चालवत असलेल्या संतोष लांभाडे यांना दिसले नाही. परिणामी मोटारसायकलला पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com