Delhi IRS officer daughter murder case details : राजधानी दिल्लीमध्ये एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राहुल याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान देशाला हादरवणारी माहिती उघड झाली आहे. राहुलने दिल्लीत येण्यापूर्वी राजस्थानच्या अलवरमध्ये आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता. राजस्थान पोलीस राहुलचा शोध घेत होते, मात्र तो रुग्णवाहिकेतून दिल्लीला पसार झाला होता. दिल्लीत पोहोचल्यावर त्याने आयआरएस अधिकाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या केली.
२३ वर्षीय नराधमाच्या या कृत्याने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. अलवरमध्ये मित्राच्या पत्नीवर बलात्कार करून आरोपी राहुल रुग्णवाहिकेतून दिल्लीत पोहोचला. तिथे त्याने तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह घरातच कोंडून ठेवला. या गुन्हेगाराने दोन राज्यांच्या पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. मैत्रीच्या नावाखाली केलेला विश्वासघात आणि त्यानंतर केलेली हत्या यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या राजस्थान आणि दिल्ली पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आरोपी राहुल मीणा याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा राजस्थानमधील राजगड येथील एका गावातील रहिवासी आहे. तो दिल्लीत एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी नोकर म्हणून काम करत होता, परंतु त्याच्या वर्तनामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. काम गेल्यामुळे तो गावी परतला होता आणि तिथेच राहत होता. २१ एप्रिल रोजी तो एका मित्रासह लग्नाला गेला होता. त्याने मित्राला लग्नात सोडले आणि काही कारण सांगून तिथून बाहेर पडला. राहुल लग्नातून थेट मित्राच्या घरी गेला आणि तिथे त्याच्या पत्नीवर बलात्कार केला.
रात्री ११ ते १२ च्या सुमारास राहुलने मित्राच्या पत्नीवर अत्याचार करून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने दुचाकीवरून पळ काढला. तो मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर आला, तिथे त्याने एक रुग्णवाहिका थांबवली आणि २२ तारखेला तो दिल्लीत पोहोचला. त्यानंतर सकाळी टॅक्सीने तो थेट आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी गेला. तिथे त्याने अधिकाऱ्याच्या तरुण मुलीवर बलात्कार केला आणि चार्जरच्या केबलने गळा आवळून तिची हत्या केली.
आयआरएस अधिकाऱ्याची दिनचर्या राहुलला पूर्णपणे माहिती होती. सकाळी अधिकारी आणि त्यांची पत्नी व्यायामासाठी घराबाहेर गेल्याची वेळ साधून बनावट चावीने तो घरात शिरला. सकाळी ६:३० ते ७:१५ या वेळेत तो घराच्या आत होता. त्याचे आत जातानाचे आणि बाहेर पडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर, त्याने घरातून २ लाख रुपये आणि दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी अखेर या आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.