Shreya Maskar
लेहेंगा किंवा स्कर्टसोबत कॉलर-नेक ब्लाउज स्टाइल केल्याने तुम्हाला एक इंडो-वेस्टर्न लूक मिळेल. यात कॉन्ट्रास्ट रंगसंगतीचा वापर करा. तुम्ही कॉलरवर सुंदर भरतकाम करू शकता.
रुंद खांदे, लांब आणि सुडौल कॉलर बोन्स असलेल्या महिलांवर कॉलर नेक ब्लाउज खूपच छान दिसतात. या प्रकारच्या ब्लाउजसाठी सॅटिन आणि जॉर्जेट कापड वापरले जाऊ शकते.
लेहेंगा किंवा स्कर्टसोबत बोट नेक ब्लाउज स्टाईल करताना आकर्षक दागिने, नीटनेटकी हेअरस्टाईल आणि दुपट्ट्याच्या अचूक ड्रेपिंगवर लक्ष केंद्रित करा. बोट नेक ब्लाउज पार्टी वेअरसाठी योग्य आहेत. हा स्टायलिश लूक देतो.
भरदार शरीरयष्टी आणि रुंद खांदे असलेल्या महिला बोट नेक ब्लाउज खूप सुंदर दिसतो. सॅटिन, जॉर्जेट, सिल्क आणि लिननसारखे हलके कापड शिवण्यासाठी योग्य आहेत.
सध्या ब्लाउजमध्ये स्पॅगेटी स्ट्रॅप पॅटर्न खूप लोकप्रिय होत आहे आणि तुम्ही ते विविध प्रकारच्या पोशाखांसोबत स्टाइल करू शकता. तुम्ही यात तुमच्या स्किन टोननुसार रंग निवडा.
नेट ब्लाउज मेहंदी, कॉकटेल पार्टी, लग्न-समारंभ आणि अगदी रिसेप्शनमध्ये लेहेंगा आणि स्कर्टसोबत परिधान करू शकता. याचे सुंदर पॅटर्न्स आता बाजारात आले आहेत.
आजकाल लेहेंग्यासोबत स्वीटहार्ट नेक, डीप व्ही-नेक, फुल स्लीव्ह, ऑफ-शोल्डर ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहेत, ज्यामुळे एक स्टायलिश लूक मिळतो.
लांब ए-लाइन स्कर्ट फुल स्लीव्ह ब्लाउजसोबत स्टाइल करा. तुम्ही या प्लेन ब्लाउजसोबत फ्लोरल प्रिंट स्कर्ट स्टाइल करा.