Saree Blouse Designs : डेली वेअर साडी दिसेल डिझाइनर, एकदा ट्राय करा 'हे' ५ फॅन्सी ब्लाउज पॅटर्न्स

Shreya Maskar

नेटचा ब्लाउज

ब्लाउजच्या पाठीमागे मॅचिंग नेट फॅब्रिक जोडून सुंदर डिझाइन तयार करू शकता. यामुळे तुमच्या ब्लाउजला एक अतिशय डिझायनर लूक मिळेल. तसेच उन्हाळ्यात ही पॅटर्न आरामदायी आहे.

Net Blouse | pinterest

कट-वर्क डिझाइन

त्रिकोणी आकाराच्या कट-वर्कसोबत सुंदर लेस आणि टॅसेल्सची डिझाइन करा. जर तुमचा ब्लाउज साधा किंवा प्रिंटेड फॅब्रिकचा असेल तर ही डिझाइन बेस्ट आहे.

Cut-Work Design | pinterest

स्टायलिश नेकलाइन

ब्लाउजला थोडा मॉडर्न ट्विस्ट द्यायचा असेल, तर ब्लाउजची पुढची नेकलाइन स्टायलिश शिवा. तुम्ही त्याला स्ट्रिंग आणि हाताने बनवलेले टॅसेल्स लावा.

Stylish Neckline | pinterest

कोट स्टाइल ब्लाउज

तुम्ही कोट स्टाइल ब्लाउज शिवून घेऊ शकता. ही डिझाइन आजकाल खूप ट्रेंडी आहे आणि खूप आधुनिक दिसते. साडीसोबत असा ब्लाउज घातल्याने फ्यूजन लूक मिळतो.

Coat-Style Blouse | pinterest

डीप नेक ब्लाउज

क्लासिक डीप नेक ब्लाउज आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुमच्या रोजच्या साड्यांसाठी एखादा स्टायलिश पॅटर्न शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. यात उन्हाळ्यात तुम्ही लाइट रंगांचा समावेश करा.

Deep-Neck Blouse | pinterest

दोरी स्टाइल ब्लाउज

मागील बाजूस दोरी असलेला ब्लाउज शिवा. ज्या महिलांना बॅकलेस ब्लाउज घालायचा नाही पण तरीही स्टायलिश लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हा अगदी योग्य आहे. रेशमी साड्या असो वा रोजच्या वापरातील साड्या हा ब्लाउज खूपच स्टायलिश दिसतो.

String-Style Blouse | pinterest

ब्लाउजचे रंग

उन्हाळ्यात पेस्टल शेड्सचे ब्लाउज परिधान करावे. यात आकाशी निळा, पांढरा, पिवळा या रंगाचा समावेश असावा. तसेच तुम्ही मल्टीकलर देखील वापरू शकता.

Blouse Colors | pinterest

टीप

उन्हाळ्यात घरी असो वा बाहेर समारंभात सुती आणि फ्लोरल प्रिंट्स असलेल्या साडी स्टाइल करा. हे कापड घाम शोषून घेते आणि हवा खेळती ठेवते.

Saree | pinterest

NEXT : बनारसी साडीवर शिवा 'या' ट्रेंडी डिझाइनचे ब्लाउज, पारंपरिक लूकला मिळेल मॉडर्न ट्विस्ट

Banarasi Saree Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...