Shreya Maskar
आजकाल लग्न असो वा ऑफिस पार्टी बनारसी साडीचा ट्रेंड पाहायला मिळतो. यावर ब्लाउज फॅशन ट्रेंड सतत बदलत असतात. पारंपरिक बनारसी साडीला मॉडर्न टच देण्यासाठी बाजारात अनेक ब्लाउजचे अनेक पॅटर्न आले आहेत.
बनारसी साड्यांचे अनेक प्रकार आहेत. जे रेशीम, फॅब्रिक आणि डिझाइन यावर आधारित आहेत. कॉटन सिल्क बनारसी साडीचा सध्या चांगलाच ट्रेंड पाहायला मिळत आहे.
बनारसी साडी खरेदी करताना कापड, पोत, डिझाइन आणि विणकाम पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच साडीवर सिल्क मार्क टॅग आहे का ते तपासा, जे रेशमाच्या शुद्धतेची हमी देते.
तुम्हाला जर वेस्टन लूक करायचा असेल तर स्ट्रिंगसह बॅकलेस ब्लाउज उत्तम पर्याय आहे. तुम्ही सिल्क, ब्रोकेड , कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज घालू शकता.
बनारसी साड्यांवर कॉलर ब्लाउज खूपच सुंदर दिसतात. तुम्ही यात क्लोज-नेक कॉलर, ओपन कॉलर अशा डिझाइन करू शकता.
पेस्टल रंगाच्या साड्यांसोबत गडद रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज छान दिसतात. कॉन्ट्रास्ट रंगसंगतीचा वापर करा, कारण आजकाल सर्वत्र हीच फॅशन पाहायला मिळते.
पारंपारिक लूकसाठी फुल स्लीव्ह, बोट नेक ब्लाउज तर मॉडर्न लूकसाठी बॅकलेस, कटआउट , स्लीव्हलेस ब्लाउज डिझाइन्स चांगल्या दिसतात.
बनारसी साडी वापरून झाल्यावर नीट ठेवून द्या. बनारसी साडी प्लास्टिकमध्ये ठेवू नका. सुती कापडात गुंडाळून ठेवा. तसेच धुतल्यावर थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका.