Shreya Maskar
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे डाग- काळे चट्टे कमी करण्यात फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन A त्वचेची चमक वाढवते आणि त्वचा हायड्रेट ठेवते.
टोमॅटोत पाण्याचे प्रमाण जास्त असते. जे त्वचेचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही टोमॅटोचा चेहऱ्यासाठी वापर करू शकता. घरीच सिंपल पद्धतीने टोमॅटो फेस पॅक आणि टोमॅटो फेस स्क्रब बनवा.
टोमॅटो फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढा. टोमॅटो जास्त कच्चे घेऊ नका.
एका बाऊलमध्ये टोमॅटोचा रस, दही, मध मिक्स करा. मिश्रण चांगले फेटून घ्या. तुम्ही यात कोरफडीचा गर आणि गुलाब पाणी देखील टाकू शकता.
आता चेहरा स्वच्छ करून त्यावर टोमॅटो फेस पॅक लावा आणि १५–२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर न विसरता चेहरा मॉश्चराइझर मॉइश्चराइज करा.
टोमॅटोचा फेस स्क्रब बनवण्यासाठी टोमॅटोचा गर काढा. त्यात बेसन, साखर मिसळून मिक्स करा. त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्याला लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा.
टोमॅटो फेस स्क्रबमुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि त्वचा अधिक मुलायम-तजेलदार दिसते. तुम्ही महिन्यातून २-३ वेळा हे आवर्जून करा. काही महिन्यात चेहरा आरशासारखा चमकेल.
घरगुती कोणताही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावण्याआधी आवर्जून त्याची पॅचटेस्ट करा. टोमॅटोच्या फेस पॅकमुळे त्वचा सॉफ्ट, फ्रेश आणि ग्लोइंग बनवते.