Shreya Maskar
लग्न , पूजा, रिसेप्शनसाठी सुंदर शालू नेसा. तुमचा लूक खूपच शोभून दिसेल. बाजारात शालूच्या खूप व्हारायटी पाहायला मिळतात.
लग्नात कोणता शालू नेसावा हे तुमच्या त्वचेचा रंग, साडीचा प्रकार आणि प्रसंगावर अवलंबून असते. शालू तुम्हाला मराठमोळा लूक देतो.
तुमच्या त्वचेचा रंग सावळा असेल तर तुमच्यावर गडद रंग उठून दिसतात. गोऱ्या रंगावर पेस्टल शेड्स छान दिसतात. तुम्ही पैठणी टाइप शालू देखील खरेदी करू शकता.
लग्नासाठी लाल, मरून, सोनेरी, हिरव्या, रॉयल ब्लू रंगाचे शालू खूप सुंदर दिसतात. यात एक पारंपरिक लूक मिळतो. तुम्ही ऑनलाइन आणि मार्केटमध्ये याची खरेदी करू शकता.
सावळा रंगाच्या महिलांवर रॉयल ब्लू, मरून, गडद हिरवा, ब्राउन, जांभळा आणि पिवळ्या रंगाचे शालू शोभून दिसतात. गडद रंगाच्या छटा तुमच्या साडीला उठाव देतील.
गोरा रंगाच्या मुलींवर पेस्टल शेड्स, फिकट गुलाबी, निळा, हलका पिवळा रंग खूप खुलून दिसतो. तुमचे फोटो देखील यात खूपच सुंदर येतील.
रिसेप्शनसाठी पिवळ्या, केशरी तसेच पेस्टल रंगाचे शालू आकर्षक दिसतात. हे थोडे शांत रंग आहेत आणि रिसेप्शन सहसा रात्रीचे असते. त्यामुळे हे रंग उठून दिसतात.
आजकाल बनारसी शालू खूपच ट्रेंडिंग आहे. ज्यावर सुंदर भरजरी वर्क पाहायला मिळते. साडीचा पल्लू खूपच नक्षीदार असतो.