Shreya Maskar
साडीला घरी इस्त्री करायची असेल तर, इस्त्रीचे सेटिंग व्यवस्थित तपासून घ्या. नाहीतर साडी जळू शकते. कायम सिल्क हा पर्यायावर निवडावा.
साडी इस्त्री करताना त्यावर हलके पाणी शिंपडा आणि मगच इस्त्री करा. ज्यामुळे साडीची कडक इस्त्री होते. साडी लगेच खराब होत नाही.
घरी साडीला इस्त्री करण्यासाठी पातळ सुती कापड साडीवर ठेवून इस्त्री करा. इस्त्री थेट साडीवर लावणे टाळा. साडी इस्त्री झाल्यावर लगेच हँगरला लावा आणि घडी करून कपाटात ठेवा. जेणेकरून सुरकुत्या येणार नाहीत.
साडीची इस्त्री करताना सगळ्यात आधी साडीच्या फॉलला इस्त्री करा. त्यानंतर साडीचा पदर आणि निऱ्यांना इस्त्री करा. तुम्ही साडी आधी नीट पीनांनी बांधून इस्त्री करू शकता.
साडीला इस्त्री करताना कधीच खूप जोर लावू नये. इस्त्री साडीवर जोरजोरात घासू नये. नाहीतर ती फाटू शकते. तसेच तिची घडी नीट बसणार नाही.
घरी इस्त्री करताना साडी एकाच वेळी पूर्ण खोलू नये. एकएक भागाची घडी उलगडा आणि मग साडीवर इस्त्री फिरवा. जेणेकरून साडीला सर्व बाजूला इस्त्री लागेल.
संपूर्ण साडीला इस्त्री करून झाल्यावर एका बाजूने अलगद उचला आणि त्यानंतर घडी घालून ठेवा. घडी घातल्यावर पुन्हा एकदा इस्त्री फिरवावी.
साडीला इस्त्री करताना चुकूनही तापमानाकडे दुर्लक्ष करू नका. तसेच इस्त्री करताना साडीखाली जाड कापड ठेवा आणि मगच इस्त्री करा.