Shreya Maskar
पेरू त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे अकाली वृद्धत्व, सुरकुत्या टाळतात आणि त्वचेला टवटवीत ठेवतात. तसेच त्वचेतील कोलेजन वाढवतात.
पेरूच्या पानांचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम १०-१२ पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावण्याआधी त्याची पॅचटेस्ट करा. जेणेकरून संसर्ग होणार नाही.
पेरूच्या पानांमध्ये गुलाबपाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करून त्यात फेसपॅक लावा. तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुवा.
फेसपॅक चेहऱ्याला 15-20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चेहरा कोरडा करून त्वचेला मॉइश्चराइजर लावा.
पेरूच्या पानांमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील जळजळ, लालसरपणा आणि वेदना कमी होतात.
तुम्ही हा फेसपॅक महिन्याभरातून 2-3 वेळा लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील. तसेच त्वचेवरील लाल चट्टे कमी होतात.
तुमची त्वचा तेलकट असेल तर हा फेसपॅक आवर्जून लावा. पेरूची पाने चेहऱ्यावरील तेल शोषून घेतात. त्वचा ताजी राहते. ओपन पोर्स बंद होतात.
पेरूच्या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरूस्त करतात. हळूहळू चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. फेस पॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करा.