Shreya Maskar
नवीन वर्षाची चाहूल लागतात सर्वत्र प्रेमाचे वारे वाहू लागतात. कारण फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचा खास दिवस 'व्हॅलेंटाईन डे' असतो. या दिवशी अनेकांची नाती बहरताना दिसतात. काही लोक प्रेम व्यक्त करतात तर काही रागवलेला प्रेयसीला मनवतात.
आठवडाभर तुमचे प्रेम साजरे करा. जोडीदाराला छोट्या छोट्या वस्तू गिफ्ट करा. तुम्ही एक रोमँटिक देखील प्लान करू शकता. तसेच जोडीदाराला त्याच्या आठवड्या ठिकाणी फिरायला घेऊन जा.
लग्नापूर्वीची तुमची पहिली भेट आठवा आणि ती 'व्हॅलेंटाईन डे'ला पुन्हा रिक्रिएट करा. घरी मस्त रोमँटिक गाणी वाजवा. तुम्ही ज्या ठिकाणी भेटला असाल तो सेटअप घरी बनवा म्हणजे तुम्हाला तुमची प्रायव्हसी देखील मिळेल. तुम्ही पहिल्यांदा कॅफेमध्ये भेटलात तर घरी तसे वातावरण तयार करा.
आजकाल रोमँटिक कॅम्पिंग नाईट हा प्रकार सर्व जोडप्यांना आवडतो. तुम्ही घराच्या बाल्कनी किंवा टेरेसवर रोमँटिक Candle Light Dinner प्लान करा. तुमच्या जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर करा. तसेच चंद्र ताऱ्यांखाली भविष्यातील स्वप्ने रंगवा.
तुमच्या जोडीदारासाठी तुमच्या प्रेमाच्या प्रवासाचा एक रोमँटिक व्हिडीओ बनवा. त्यात तुमच्या मनातील भावना शेअर करा आणि जोडीदाराला पाठवा. व्हिडीओ पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी येईल.
लग्नात तुम्ही सात वचन घेतले असालच तर त्याची पुन्हा एकदा जाणीव एकमेकांना करून द्या. प्रेमाची नवीन वचने घ्या. तुमचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करा. एकमेकांसोबत सुंदर फोटो काढा.
'व्हॅलेंटाईन डे' तुम्ही वन डे ट्रिप प्लान करा. यात बाहेर चित्रपट पाहायला जा. मग जोडीदारासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरफटका मारा. त्यानंतर रोमँटिक डिनर करा. रात्री मस्त लाँग ड्रायव्हर जा. एकमेकांसोबत तो दिवस घालवा.
महिलांना जर आपल्या नवऱ्याने एखादा पदार्थ बनवून खाऊ घातला तर तो खूप आवडतो. त्यामुळे बायकोच्या आवडीचा एखादा गोड पदार्थ बनवा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला. ती पुन्हा तुमच्या प्रेमात पडेल.