Shreya Maskar
हिवाळ्यात साडी स्टाइल करायची असेल तर साडी विथ जॅकेट बेस्ट ऑप्शन आहे. आजकाल सर्वत्र ही फॅशन पाहायला मिळते.
लग्न-समारंभात आणि ऑफिस पार्टीमध्ये सुद्धा साडीसोबत काही नवीन लूक करायचा असेल तर 'साडी विथ जॅकेट' ट्राय करा. आजकाल ही ट्रेंडी फॅशन आहे. हिवाळ्यात यामुळे साडी नेसल्यावर थंडी वाजत नाही आणि लूकही चांगला येतो.
'साडी विथ जॅकेट' तुम्हाला ऑनलाइन आणि बाजारात स्वस्तात मस्त व्हरायटीमध्ये मिळतील. तुम्ही पारंपरिक आणि वेस्टन दोन्ही लूक तयार करू शकता.
कॉन्ट्रास्ट रंगामध्ये जॅकेटची निवड करा. जेणेकरून लूक अधिक खुलून येईल. साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट होईल असा जॅकेटचा रंग निवडा. नेटचं जॅकेटही साडीवर अतिशय आकर्षिक दिसते.
साडीवर घालण्यासाठी शॉर्ट जॅकेटपासून ते लाँग जॅकेटपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट उपलब्ध आहेत. यात वेगवेगळे आकार आणि कापड पाहायला मिळते. उदा. वेल्वेट जॅकेट, प्रिंटेड जॅकेट्स, ब्लेझर
भरजरी साडीवर घालायला प्लेन जॅकेट आणि प्लेन साडीवर भरजरी जॅकेट स्टाइल करा. साडीनुसार मॅचिंग कपडा घेऊनही तुम्ही जॅकेट शिवून घेऊ शकता.
तुम्हाला ऑफिस पार्टीमध्ये तुम्ही फॉर्मल जॅकेटसोबत साडी स्टाइल करा. मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी वापरा.
रेशमी साडीसोबत ब्रोकेड किंवा वेलवेट जॅकेट तर साध्या साडीसोबत ब्लेझर किंवा डेनिम जॅकेट वापरून तुम्ही स्टायलिश लूक करू शकता.