Shreya Maskar
आजकाल आपण लग्न समारंभात जाताना साडीचा पदर हातावर मोकळा सोडता, पण तो सांभाळताना आपल्याला अडचण येते. त्यामुळे आपण अनेकदा पदर पीन करतो आणि आपला स्टायलिश लूक येत नाही. तेव्हा ही सिंपल ट्रिक फॉलो करा.
तुमच्या उंचीनुसार पदर हातावर सोडा. खांद्यावरून पदर सोडताना तो गुडघ्यापर्यंत यावा. जेणेकरून तो पायात येणार नाही. नाहीतर तुम्ही पडू शकता.
हातावर सोडलेला पदर तुम्ही मोकळा ठेवूनही पीन करू शकता. सर्वप्रथम संपूर्ण पदर हातावर सोडा आणि त्यानंतर जास्तीचा पदर ब्लाउजच्या खालच्या बाजूला घडी करून पीन करा. यामुळे जास्तीचा पदर लोळणार नाही आणि तुम्ही आरामात वावराल.
साडीच्या निऱ्या व्यवस्थित काढा, नाहीतर सोडलेला पदर पोटावर येतो, ज्यामुळे पोट पुढे आल्यासारखे दिसते. पदर हातावर सोडल्याने तुम्ही थोडे जाड दिसता.
हातावर सोडलेला पदर नीट सांभाळायचा असेल तर पदराचा एक काठ दुसऱ्या हातात बाजूला धरा. त्यामुळे पदराची नक्षी छान दिसते आणि तुम्ही बारीक दिसतो.
साडीच्या निऱ्या कायम पीन करा. जेणेकरून साडी फुलणार नाही. तुम्ही चालताना ती मध्ये येणार नाही. तसेच तिचा लूक स्टायलिश येईल.
पदर मोकळा सोडायचा असेल, तर त्याला खूप जास्त प्लेट्स न करता थोडे मोठे आणि मोकळे प्लेट्स घ्या.खांद्यावर व्यवस्थित पिनअप करा.
साडीचा पदर जास्त ओढू नका, यामुळे तो व्यवस्थित राहतो आणि काम करतानाही अडथळा येत नाही.