Shreya Maskar
व्हॅलेंटाईन डे महिन्याभरावर आला आहे. सर्वत्र 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. अनेक मुलं आपलं प्रेम या दिवशी व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या.
वेळेत प्रेमाची भावना व्यक्त करा. उगाच घाबरून स्वतःच्या भावना मनातच ठेवू नका. कारण एकदा वेळ गेली की ती परत येत नाही. भविष्यात कोणताही पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या.
प्रेम व्यक्त करणे हे सोपे नसते. मनात चिंता, भीती आणि गोंधळ असतो. प्रेम व्यक्त होते. मात्र ते आयुष्यभर टिकवणे कठीण असते. ज्यासाठी तुम्हाला आधीच स्वतःला तयार व्हावे लागते.
तिला प्रपोज करण्याआधी तुम्ही सर्वप्रथम स्वतःला समजून घेणे. तुमच्या भावना खऱ्या आहेत याची खात्री करा. प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात स्पष्ट असता, तेव्हा तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला व्यक्त करणे सोपे होईल.
प्रपोज करताना योग्य वेळ आणि वातावरण निवडणे महत्त्वाचे आहे. तणावपूर्ण वातावरणात तुमचे प्रेम व्यक्त करणे टाळा. कबुली देण्यासाठी एक शांत, निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडा. यामुळे तुमच्यात मोकळेपणाने संवाद घडेल.
प्रेम व्यक्त करताना तुमच्या शब्दांमध्ये साधेपणा ठेवा. जास्त नाट्यमय अगदी सिनेमामध्ये दाखवतात, तसे करू नका. कारण आयुष्य चित्रपट नाही. त्यामुळे तिला तुमचे बोलणे सामान्य आणि खरे वाटू दे. समोरच्याला Comfortable करा.
प्रेमात कधीच तुम्हाला 'होकार' मिळेल असे धरून प्रपोज करू नका. नकार पचवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. तिने दिलेला नकारही तुम्ही सकारात्मक पद्धतीने घ्या. समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करा. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे भविष्यात तुमच्यात चांगली मैत्री होईल.
डिजिटल युगात आपण प्रपोज पण ऑनलाइन करायला जातो, हीच मोठी चूक आहे. तुम्ही समोरासमोर उभे राहून तिच्यासाठीचे प्रेम व्यक्त केलात तर तिला तुमच्या भावना तुमच्या डोळ्यातून, बोलण्यातून, वागण्यातून अधिक प्रकर्षाने जाणवतील.