Shreya Maskar
आजकालच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. भरपूर जंक फूड खातो. तसेच आहाराकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपले पोटाची चरबी वाढते आणि वजन वाढते.
तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असेल तर व्हॉल्यूम इटिंग (Volume eating ) ची पद्धत आपल्या आहारात अवलंबा.
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करायचे असेल तर कॅलरीची कमतरता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभरात तुम्ही जितक्या कॅलरी बर्न करता त्यापेक्षा कमी कॅलरीज वापरता. ज्यामुळे वजन कमी होते.
व्हॉल्यूम इटिंग म्हणजे ज्यामध्ये अन्नाचे प्रमाण मर्यादित करण्याऐवजी, फळे, भाज्या आणि सूपसारखे कमी-कॅलरी, जास्त पाणी आणि जास्त फायबर असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाऊन पोट भरल्याची भावना निर्माण केली जाते.
शरीरात जास्त पाण्याचे प्रमाण ठेवण्यासाठी पाण्यासोबतच फळे, सूप यांचा आहारात समावेश करा. नारळाचे पाणी प्या. यामुळे शरीरातील खराब जंतू निघून जातात.
तसेच आहारात जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थांचा समावेश करा. यात हिरव्यागार शेंगा खा. उकडलेले कडधान्य खा. फक्त त्यात कोणतेही मसाले टाकू नका.
वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीजचे पदार्थ खा. यात पालेभाज्यांचा भरपूर समावेश करा. बाहेरचे जंक फूड कमी करण्यापेक्षा पूर्ण बंद करा. जेणेकरून या पद्धतीचा परिणाम दिसून येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.