खिसे कापू कंत्राटदार! KDMT कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला; मनसे मैदानात

KDMT Contract Workers Strike Due To Salary Deduction In Kalyan: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झाल्याच्या आरोपामुळे कामगारांनी संप पुकारला आहे. मनसेकडून तीव्र इशारा देण्यात आला असून, प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना डेपोमध्ये प्रवेश रोखण्याचा इशारा दिला आहे.
KDMT contract workers stage a strike in Kalyan protesting alleged salary deductions in the transport department.
KDMT contract workers stage a strike in Kalyan protesting alleged salary deductions in the transport department.Saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून मोठ्या प्रमाणात रक्कम कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कपात नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि कंत्राटदाराकडे लेखी स्वरूपात जाब विचारण्यात आला होता. मात्र, कंत्राटदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी परिवहन विभागात सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

KDMT contract workers stage a strike in Kalyan protesting alleged salary deductions in the transport department.
Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

याप्रकरणी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना इशारा देत, कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. कर्मचाऱ्यांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही,अशी भूमिका मांडली. तसेच, या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला नाही, तर केडीएमटी परिवहन डेपोमध्ये एकाही अधिकाऱ्याला प्रवेश करू देणार नाही, असा इशाराही उल्हास भोईर यांनी दिला आहे.

KDMT contract workers stage a strike in Kalyan protesting alleged salary deductions in the transport department.
Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

धर्मेंद्र प्रधान नव्हे, संपूर्ण मोदी सरकारनेच राजीनामा द्यावा – महेश तपसे यांचा हल्लाबोल

दरम्यान कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. युवकांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह संपूर्ण मोदी सरकारनेच पायउतार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com