मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? गृहमंत्री अमित शाह यांची घेतली अचानक भेट

Dharmendra Pradhan Latest News : जंतरमंतरवरील NEET आंदोलन तीव्र होत असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची अचानक भेट घेतल्याने राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानSaam Tv
Published On

NEET परीक्षा घोटाळ्याचे वादळ आता थेट केंद्र सरकारच्या दारापर्यंत पोहोचले आहे. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत उग्र रूप धारण केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईने 'जंतर-मंतर ते संसद' असा धडक मोर्चा काढला.

आंदोलक थेट संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांची भेट; राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

एकीकडे संसदेच्या दारात विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू असतानाच, दुसरीकडे आज सकाळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये झालेल्या बंद दारामागील चर्चेनंतर 'धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देणार का?' या चर्चेला उधाण आले आहे.

 शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक कशासाठी? अभिजित दीपकेंचा गंभीर आरोप, थेट व्हिडीओही केला पोस्ट

महिन्याभराचा संताप रस्त्यावर

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात विद्यार्थी महिन्याभरापासून सातत्याने जंतर-मंतरवर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा, या मागणीवर तरुण ठाम आहेत. आज आंदोलकांनी सुरक्षा भिंत भेदून संसदेच्या गेटपर्यंत मुसंडी मारल्यामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.

 शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या शब्दाखातर अभिजीत दीपकेंनी सोडलं उपोषण; थेट संसद मार्चमध्ये झाले सामील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com