

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील आजचे पहिले गोल रिंगण सोलापूर जिल्ह्यातील पुरंदवडे येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.
बई बंगळूर महामार्गावर नवले पूल सेल्फी पॉईंट जवळ चारचाकी गाडीला आग,
गाडीचे नुकसान
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली
काही काळ वाहतूक थांबवण्यात आली.
गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणी केलेले बियाणे उगवणार की नाही या चिंतेत शेतकरी असताना आज जिल्ह्यात पावसाचे आगमन
पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....
दिल्ली येथील जंतर-मंतरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या कॉम्रेड नेहा बोरा यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या दडपशाहीचे तीव्र पडसाद अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात उमटल्याचे बघायला मिळालेत.. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.. यावेळी आंदोलकांनी "शिक्षण मंत्री राजीनामा द्या", "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला..
इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या एका गाळ्याचा स्लॅब सोमवारी अचानक कोसळल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे आणि माजी नगरसेवक स्वप्नील राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात.... गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा कायम असताना आज शहरातील काही भागात पावसाला सुरवात झाली आहे..
- मागील आठवड्या भरापासून दिवसांपासून पावसान दांडी मारली असल्यानं उकाडा जाणवत होता...
- मात्र सकाळ पासून ढगाळ वतावरणानंतर दुपारी झाली पावसाला सुरुवात
- साधारण रिमझिम पावसाला सुरवात झालीय...
- हवामान विभागाने पावसाचा ऍलो अलर्ट दिला आहे...
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला झाली सुरवात...पुढील तीन ते चार दिवस हलका मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
- काल परवा पासून अधून मधून पाऊस येत आहे... मात्र अजूनही धुवाधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे....
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP)चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या. सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किंवा मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि NEET परीक्षेशी संबंधित मृत्यू झालेल्या २० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता बीडमध्येही तीव्रतेने उमटू लागले आहेत. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि जंतर-मंतरवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. "विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. त्यामुळे बीडमध्येही विद्यार्थी आंदोलनाचा आक्रोश अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
समाजवादी पक्षाच्या (सपा) खासदार डिंपल यादव यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर बोलताना सरकार आणि पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "आज लोकशाहीच्या इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाईल. पोलिसांच्या डोळ्यातही लाज/शर्मिंदगी दिसत होती... काही पोलीस अधिकारी गुंड बनले होते. काही पोलीस कर्मचारी विना वर्दी (नागरी कपड्यांमध्ये) आले आणि त्यांनी मुलांना मारहाण केली. मुलांना करंट दिला गेला. जिथे नियमानुसार पायांवर मारायचे असते, तिथे मुलांच्या छातीवर मारले गेले आहे, हा आघात भारतमातेच्या छातीवर झाला आहे."
शिवथर गावच्या हद्दीत सापळा रचून गोपनीय सातारा तालुका पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १ कोटी ५६ लाख २८ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू, ४२ लाखांचा टाटा कंटेनर आणि एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली परभणी डीसीसी बँकेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला आहे, 21 पैकी 13 उमेदवार या निवडणुकीत आधीच बिनविरोध म्हणून निवडून आले होते तर उर्वरित आठ जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती दरम्यान आज सकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे परभणी हिंगोली विधान परिषदेचे विद्यमान आमदार सईद खान यांची तर प्राथमिक कृषी पतपुरवठा असलेल्या विविध सेवा सोसायटी मधून सौ राजमती मुटकुळे यांचा विजय झाला आहे या विजयानंतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला होता.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आपलं उपोषण सोडलंय....सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण सोडलंय....सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिपके यांनी उपोषण आंदोलन सुरु केलं होतं....
मानखुर्द येथे बेस्टच्या 503 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दिली. अपघातानंतर सर्व जखमींना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
केंद्र सरकारचा विरोधात निषेध करत आणि "जतर मतर" वर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सांगलीत पुरोगामी संघटनेच्या वतीने स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले.. यावेळी पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्ते आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. जतर मंतर वर लोकशाही पध्दतीने आंदोलन सुरू आहे. त्याठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला याचा निषेध यावेळी करण्यात आला.
पार्लियामेंट स्ट्रीटजवळ निदर्शकांसोबत झालेल्या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक सब-इन्स्पेक्टर जखमी झाले.
ते म्हणाले, "आम्ही बॅरिकेडजवळ उभे होतो, तितक्यात त्यांनी (निदर्शकांनी) दगडफेक केली."
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच विविध मुद्द्यांवरून सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. जोरदार गदारोळ आणि गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. आता राज्यसभेची पुढील बैठक २१ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता पुन्हा सुरू होईल.
आम्ही सगळे एकच सांगतोय की यावर सविस्तर चर्चा करा. आपल्या शिक्षण व्यवस्थेत गंभीर अडचणी आहेत, पण तुम्ही (केंद्र सरकार) या विषयावर चर्चा करायलाच तयार नाही आहात.तुम्ही निष्पाप मुलांवर अश्रूधुराच्या नळकांड्या का फोडत आहात? आणि त्यांना मारहाण का करत आहात? शेवटी ती आपलीच मुलं आहेत, असे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात गेल्या दोन तासांपासून आंदोलन सुरू आहे. पाऊस सुरू आहे तरी आंदोलन हटायला तयार नाहीत. एका बाजूला पोलीस छत्र्या घेऊन थांबलेले आहेत तर दुसरीकडे आंदोलक तरुण पावसात भिजत आहेत.
नवी दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर झालेली दडपशाही आणि अभिजित दिपके यांच्यावरील शाईफेकीचे तीव्र पडसाद आता धुळ्यात देखील उमटले आहेत, शिक्षण व्यवस्थेचं वाढतं बाजारीकरण आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत, आज धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात 'सत्यशोधक विद्यार्थी संघटने'च्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक निदर्शने करण्यात आली, 'हुकूमशाही नही चलेगी' आणि 'संविधान वाचवा' अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दणाणून गेला.
देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा घोटाळ्यावरून आणि दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना आंदोलन करण्याचा हक्क नक्कीच आहे, पण आंदोलन हे नेहमी शांततापूर्ण मार्गानेच झाले पाहिजे. जर कोणी कायदा हातात घेऊन आंदोलन करत असेल, तर पोलीस नियमानुसार त्यांचे काम करणारच असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. आम्ही विद्यार्थ्यांची अडचण आणि त्यांच्या वेदना चांगल्या प्रकारे समजू शकतो. दिल्लीत जे प्रदर्शन सुरू आहे, त्या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यवतमाळच्या बसस्थानक परिसरातील संविधान चौकात पालक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला पाठिंबा वांगचुक आणि दिपके यांना दर्शविले.आंदोलनामुळे काही वेळेसाठी वाहतुक सेवा ठप्प झाली होती.
जेव्हा लोक आंदोलन करायचे, तेव्हा इंग्रजसुद्धा त्यांचे ऐकून घ्यायचे. म्हणूनच आज जगभरात महात्मा गांधींचे नाव आदराने घेतले जाते, कारण त्यांनी जगाला आंदोलनाचा मार्ग दाखवला. पण हे सरकार ज्या पद्धतीने आंदोलकांना हटवत आहे, ते पाहता या सरकारला शेवटी अत्यंत अपमानास्पदरित्या सत्ता सोडावी लागेल.
दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय सेवेसाठी सोनम वांगचुक यांना दवाखान्यात नेल...
या गोष्टीचे विरोधी पक्षाचे नेते राजकारण करून भांडवल करायला लागले...
न्यायालयाच्या निर्देशाने जेव्हा कारवाई होते तेव्हा ती कुणाच्याही समर्थनार्थ नसते...
लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाकडून आपल्या पोळ्या भाजण्याचे काम सुरू आहे...
संसदेच्या दारात CJP चा मोर्चा दाखल झाला आहे. सध्या सर्वच भागात तणावाचे वातावरण सुरू झाले आहे. त्याचदरम्यान मुंबईत २६ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी एसीचे राऊटर आणि वायर चोरी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आश्रफ दफाली असे या चोरट्याचे नाव आहे. या आरोपीकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून त्याने यापूर्वी आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा पोलीस तपास सुरू आहे.
संसदेच्या दारात CJP चा मोर्चा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रूधुराचा वापर
काही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले
सहा खासदारांचा पक्षांतर रीतशीर झाला असून त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून आमची खासदारांची संख्या आता 13 झाली आहे शिवसेना मजबूत ठरली आहे.येणाऱ्या विस्तारामध्ये देखील शिवसेनेला चांगला स्थान मिळेल. केंद्रात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री आम्हाला मिळणार असल्याची माहिती आहे.
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला आता हिंगोली मधून देखील पाठिंबा मिळाला आहे अभिजीत दिपके यांचं मूळ गाव असलेल्या संतुकपिंपरी गावा सह जिल्हाभरातील शेकडो नागरिक हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आंदोलनासाठी जमा झाले आहेत.
यवतमाळ शहरा लगत असलेल्या लोहारा कोलाम पौड जिल्हा परिषद शाळेचा काही भाग कोसळला
जीर्ण झालेल्या शाळेचा एका बाजूचा पिलर कोसळला
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही जखमी नाही
सोनम वांगचुक यांच्या विनंतीला मान देऊन अभिजित दीपकेंनी उपोषण सोडलं
cjp च आज संसदेवर मोर्चा
भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि नागरिकांनी भर पावसात जोरदार आंदोलन केले.
मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलकांनी हातात फलक घेऊन सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
राज्यभरात वीज वितरण कार्यालयाने विद्युत ग्राहकांना स्मार्ट मीटरची केलेली सक्ती आणि त्यामुळे वाढीव येत असलेले विजेचे देयक यामुळे हिंगोलीत नागरिकांनी थेट रास्ता रोको करत राज्यमार्ग रोखला आहे औंढा जिंतूर राज्य मार्गावरील रामेश्वर गावाच्या जवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं आहे
सोनम वांगचुक यांचा उपोषणाला नंदुरबार जिल्ह्यातून पाठिंबा...
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाजवळ उपोषण सुरू...
सोनम वांगचुक यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण
दिल्लीमध्ये आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज चे पडसाद संभाजीनगरमध्ये
आमदार अंबादास दानवे यांची देखील आजाद समाज पार्टीच्या आंदोलनामध्ये उपस्थिती
आझाद समाजाच्या पार्टीच्या वतीने क्रांती चौकात भव्य निदर्शने
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन
केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
संत तुकाराम महाराजांचे तिसरं गोल रिंगण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालय वर पार पडलं.
अकलूज मध्ये आजचा तुकाराम महाराजांचा मुक्काम आहे.
सोलापूर जिल्ह्यात आज पालखीने आगमन केल्यानंतर मोठ्या आनंदात आणि उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आलं.
लक्ष्मण हाके यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा
ओबीसी जनता पार्टी नावाचा नवा पक्ष हाके उभारणार
ओबीसी बांधवांसाठी नवा पक्ष उभा करणार
सोनम वांगचुक यांच्या अटकेचा अहिल्यानगरात निषेध
संघर्ष आंदोलनातून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर महानगर पालिकेच्या एकात्मका नगर शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने तेथील विद्यार्थी पालिका आयुक्तांच्या कार्यलय परिसरात आले आहे
पालिका आयुक्तांच्या दालनासमोर शाळा भरवली
भंडारदरा परिसरातील हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
पावसाची झिमझिम सुरू असताना हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असलेल्या मालाड येथील दहा पर्यटकांवर आडव्या कड्याच्या मागील बाजूस अचानक माती आणि दगड कोसळले.
या घटनेत चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
तळेगाव दाभाडे येथील मायमर जनरल रुग्णालयात एक आगळावेगळा पाहुणा दाखल झाला आणि क्षणभर संपूर्ण रुग्णालयाचे वातावरणच आनंदमय झाले.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर थेट रुग्णालयातील केसपेपर काढण्याच्या दालनात दाखल झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत हा अनोखा क्षण अनुभवला.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे मुळ प्राप्त झाले आहे.
यातून सभा मंडपा शेजारील सहा दगडी पुरातन ओवर्रा भाविकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या मुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे
अंतराळात भारताचा झेंडा फडकावला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदींनी साधला संवाद
नातेपुतेहून माऊलींची पालखी माळशिरसकडे मार्गस्थ ॉ
आज पुरंदवडे येथे रंगणार गोल रिंगण सोहळा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज नातेपुते ते माळशिरस असा प्रवास सुरु झालाय
पुरंदवडे येथे आज गोल रिंगण सोहळा रंगणार असून वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नालासोपारा -
नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचे हात बांधून नागरिकांनी केली बेदम मारहाण
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
हा व्यक्ती मुलं चोरतो असा त्याच्यावर आरोप करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
नालासोपारा पूर्व नगीनदास पाडा येथे काल दुपारी चार ते साडे चार ची घटना असल्याची माहिती समोर आली आहे
याबाबत पोलिसान कडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडूनच आहे मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक नसल्याने राज्यात अनेक ठिकाणी मुसलदार पाऊस पडत आहेत त्यामुळे संपूर्ण भाजीपाला शप्पथ झाला आहेत भाज्यांचे दर घसरलेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येते
पालखी सोहळ्यात बंदोबस्तावरील पोलिसांची दुरवस्था; मूलभूत सुविधांचा प्रश्न
पालखी सोहळ्यात दिवसरात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अपुऱ्या विश्रांतीसह पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब समोर आली आहे.
या परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नागपूर -
- लेटरपॅडचा गैरवापर अन दादागिरी बंद करा भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा सज्जड दम.
- पदाच्या जोरावर धमक्या, बिअर बार-ढाब्यांवरील भांडणे आणि मारहाण करणाऱ्यांना बावनकुळेंच्या स्पष्ट इशारा
- अशा वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते,
- सत्ता ही सेवेसाठी, दादागिरीसाठी नाही," बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश
नागपूर -
- पूर्व विदर्भात पाऊस लांबल्याने पेरणी क्षेत्र 58.55% टक्के, यंदा पेरणी क्षेत्र घटनेची व्यक्त केली जात आहे भीती
- पाऊस लांबल्याचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे, आतापर्यंत केवळ 21% क्षेत्रावरच धनाच्या रोवणी
- पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस,सोयाबीन, धान, तूर, मका, बाजरी, ज्वारी, तीळ, ऊस ही पिके घेतली जाते
- सर्व पिकांची 15 जुलैपर्यंत लागवड केली जाते. 16 जुलै पर्यंत विदर्भात नियोजित पेरणीच्या फक्त 58.55% एवढाच क्षेत्रावर पेरणी आटोपल्या
- यातील सर्वाधिक 89.3% पेरणी वर्धा जिल्ह्यात 67.64, चंद्रपूर जिल्ह्यात 67.19%टक्के, नागपूर जिल्ह्यात 67.64 टक्के पेरणी झाल्या
आठवड्याभरानंतर नवी मुंबई शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी
नवी मुंबई शहरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडला
आता नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली
खारघर, वाशी, बेलापूर, उलवे, नेरूळ या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे
सोलापूर -
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी
यांच्यासह स्वागतासाठी अनेक नागरिक सहभागी
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
नीट पेपर फुटी प्रकरणावरून गदारोळ होणार
सोनम वांगचुक आंदोलन, नीट पेपर फुटी प्रकरण, राम मंदिर प्रकरणावरून विरोधक आक्रमक होणार
नागपूर -
- नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस.
- रविवारी रिमझिम पावसाने ब्रेक घेतल्याने मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम.
- तापमानात लक्षणीय घट होऊन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
- पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार, मात्र दमदार पावसाअभावी चिंता कायम.
- हवामान विभागाचा पुढील ४–५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.
- काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी.
- नागपुरात शनिवारी सायंकाळपर्यंत ९.४ मिमी पावसाची नोंद.
- कमाल तापमान २८.६ अंशांवर घसरल्याने वातावरण आल्हाददायक झाले.
नाशिक -
- नाशिकसाठी पारंपरिक हेवी मेट्रो प्रकल्पाचा विचार करण्याची मागणी
- आमदार राहुल ढिकले यांच्या पत्राला शासनाकडून सकारात्मक उत्तर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ जुलैला सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यावर महत्त्वाची बैठक बोलवली
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर
- निओ मेट्रोऐवजी हेवी मेट्रो पर्यायाचा विचार करण्याची आमदार राहुल ढिकले यांची मागणी
- नाशिकची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक, भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन नियोजनाची आवश्यकता
- २१ जुलैच्या बैठकीनंतर नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
पुणे -
रात्रीच्या वेळी एसटी बस अनाधिकृत हॉटेलवर थांबवणाऱ्या 40 एसटी गाड्यावर कारवाई
पुणे एसटी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून 80 हजाराच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे
महिनाभरात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चाळीस एसटी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे
दोषी असणाऱ्या प्रत्येक चालक आणि वाहकाकडून प्रत्येकी एक हजार रुपये असा दंड वसूल करण्यात आला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.