Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Khardi Kasara third railway line latest news : मुंबईकर आणि उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! खर्डी-कसारा दरम्यानची १३.५३ किलोमीटर लांबीची तिसरी रेल्वे मार्गिका सुरू झाली आहे.
Kasara
Kasara saam tv
Published On: 

Mumbai local train news today : मुंबईकरांसाठी आणि उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खर्डी-कसारा मार्गावर तिसरी मार्गिका सुरू झाली आहे. रविवारी या मार्गावर लोकल धावली. आव्हानात्मक आणि डोंगराळ अशा खर्डी-कसारा दरम्यानची १३.५३ किलोमीटर लांबीची तिसरी रेल्वे मार्गिका रविवारपासून सुरू झाली. नव्या मार्गावर ताशी ११७ किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेवरील गाड्यांचा ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. खर्डी-कसारा या मार्गावरील कामासाठी मध्य रेल्वेने २ दिवसांत १२ तासांचा विशेष ब्लॉक घेतला होता. ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गाची जोडणी आणि कसारा यार्डच्या पुनर्रचनेची कामे रेल्वेकडून करण्यात आली. या नव्या मार्गावर ११७ किलोमीटर प्रतितास वेगाने चाचणी घेण्यात आली. कसारा-खर्डी या मार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे वाहतुकीला परवानगी मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Kasara
ZP Election : दसऱ्यानंतर भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसच्या बालेकिल्यात ४० जणांनी हातात धरलं कमळ

२ दिवसांचा ब्लॉक झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या नव्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मार्ग सुरू करण्यात आला. आयुक्तांनी बांधकामाचा दर्जा, रुळांची स्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. या मार्गाच्या उभारणीत डोंगराळ आणि आव्हानात्मक भूप्रदेशातून विद्युतीकृत रेल्वे मार्ग टाकण्यात आला. त्यायाशिवाय पुलांचे बळकटीकरण आणि विस्तार, मोठ्या प्रमाणावर मातीकाम, आधुनिक सिग्नल यंत्रणा व विद्युतीकरणाची कामे करण्यात आली. खर्डी आणि कसारा येथील रेल्वे यार्डांमध्येही सुधारणा करण्यात आल्या.

Kasara
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

कल्याण-कसारा हा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही याचा परिणाम होईल. एक्स्परेस आणि लोकल वेळेवर धावतील.तसेच प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com