सागर निकवाडे, नंदूरबार प्रतिनिधी
Congress workers join BJP Maharashtra, Navapur : दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसला बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला आहे. ४० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा जोरदार धक्का मानला जात आहे.
नंदुरबार आणि नवापूर हा काँग्रेसचा गढ मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यात भाजपने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे नवापूर शहरात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Zilla Parishad election news)
दसरा पार पडताच भाजपने नवापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचे ४० हून अधिक स्थानिक कार्यकर्ते, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचले आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हातात धरल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच लागलेल्या या खिंडारामुळे भाजपची ताकद आणखी वाढली असून, पक्षसंघटनेला नवे बळ मिळाले आहे.
नवापूरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, ४० हून अधिक काँग्रेस कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपात आज जाहीर प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, विधानसभा प्रमुख अजय वसावे, एजाज शेख आणि विश्वास बडोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांवर विश्वास ठेवून तरुण पक्षात प्रवेश करत असून, यामुळे पक्षसंघटनेला मोठे बळ मिळेल, असा विश्वास निलेश माळी यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे नवापूर शहर आणि तालुक्यात भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे. भविष्यातही नवापूर शहर आणि तालुक्यात मोठ्या संख्येने इतर पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा ठाम विश्वास भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.