Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून एकूण अटकेची संख्या आठवर पोहोचली आहे. शस्त्रांचा शोध आणि कथित कटाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
Tiger Shroff Firing Case Update News
Tiger Shroff Firing Case Update News AI image
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Tiger Shroff firing case latest news : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश आले आहे. पोलिसांनी गुजरातमधून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हरियाणाच्या बडोदा येथून अंकित नावाच्या या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे. यासह या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या ८ वर पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन महिलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी देशभरातून या गुन्ह्याशी संबंधित ८ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अंकित नावाच्या आरोपीला नुकतेच गुजरातधून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना आता मुंबईतील किल्ला कोर्टात (Killa Court) हजर केले जाणार आहे. इतर ४ आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

परदेशात सेटल करण्याचे आमिष

या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार अनिल पंडित असल्याचे समोर आले आहे. कॅनडामध्ये सेटल करण्याचे आमिष दाखवून आणि घरच्यांची काळजी घेण्याचे आश्वासन देऊन अनिल पंडितने गरजू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. अवघ्या काही हजारांच्या लोभापोटी हे तरुण टायगर श्रॉफवर गोळीबार करायला तयार झाल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

Tiger Shroff Firing Case Update News
Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

अमिताभ, आमिर, अक्षय आणि सलमानच्या घरांचीही झाली होती रेकी

पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपींनी फक्त टायगर श्रॉफच नाही, तर इतर बड्या स्टार्सनाही लक्ष्य करण्याचा कट रचला होता. अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी आरोपींनी रिक्षाचालकांची मदत घेतली. "आम्हाला अभिनेत्यांची घरं पाहायची आहेत आणि फोटो काढायचे आहेत," असे सांगून त्यांनी रिक्षाचालकांकडून बड्या अभिनेत्यांच्या घरांचा पत्ता मिळवला.

वांद्रे परिसरात फिरून त्यांनी या घरांची रेकी केली. मात्र, या सेलिब्रिटींच्या घरांवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असल्याने तिथे सुरक्षितपणे हल्ला करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी अनिल पंडितला याची माहिती दिली आणि त्याचे फोटो-व्हिडिओही पाठवले.

Tiger Shroff Firing Case Update News
KDMC प्रभाग समित्यांवर शिंदेंचं वर्चस्व; शिवसेनेचे ५ सभापती, भाजप-मनसेला किती मिळाले?

शेवटी टायगर श्रॉफला केले लक्ष्य

इतर बड्या स्टार्सच्या घरांवरील कडक सुरक्षा पाहिल्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला. टायगर दर शनिवार-रविवारी फुटबॉल खेळायला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, आरोपी ११ ऑक्टोबरला जुहूच्या मैदानावर गेले होते, पण टायगर तिथे आला नाही. त्यानंतर ते १८ ऑक्टोबरला पुन्हा शस्त्रांसह मैदानात पोहोचले. या कालावधीत हरियाणातील काही इतर तरुणही मुंबईत येऊन रेकी करून परत गेल्याची माहिती समोर आली आहे.

शस्त्रे जप्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

या गोळीबारासाठी एक देशी आणि एक विदेशी पिस्तूल वापरण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर मुंबईतून बाहेर पडताना आरोपींनी दोन्ही पिस्तुले अज्ञात ठिकाणी फेकून दिली होती. आता ही शस्त्रे शोधून काढण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

अक्षय कुमारच्या घरावरही बुलेटप्रुफ काचांचे काम सुरू

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Lawrence Bishnoi गँगच्या निशाण्यावर अक्षय कुमारही होता, आणि आरोपींनी त्याच्या घराचीही रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय कुमारनेही सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या घरावर बुलेटप्रुफ काचा लावण्याचे काम सुरू केले असून, त्याच्या घराबाहेरही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी सलमान खानच्या घरावरही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या, ज्या आता सुरक्षेच्या कारणास्तव अपग्रेड करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com