संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तीव्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीने प्रेमसंबंधांतील छळ आणि फसवणुकीला कंटाळून 28 डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याचा गुन्हा पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्यात दाखल होता. मात्र, गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले.
या दरम्यान या प्रकरणातील आरोपी कौशिक प्रकाश पावशे हा अपक्ष उमेदवार अनंता पावशे यांचा पुतण्या असून आरोपी त्याचा काका अनंता पावशे याचा प्रचार करण्यासाठी परिसरात फिरत असल्याचे तरुणीच्या घरच्याना दिसून आल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरोपीला अटक करा. ही मागणी करत तब्बल अर्धा तास घेरावा घालत गोंधळ घातला. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी कौशिक यांचे 2020 पासून प्रेमसंबंध होते.
लग्नाचं वचन देत कौशिकने नेहासोबत शारीरिक संबंध ठेवले, वेळोवेळी मारहाण केली. इतकेच नाहीतर फोटो काढून तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये उकळले. तसेच तरुणीची हैदराबादला बदली झाली असतानाही आरोपीने तिथे जाऊन मारहाण केल्याचे पुरावे समोर आले आहेत.16 आणि 24 डिसेंबर दरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. मृत्यूपूर्वीही तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आले. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर काही दिवसांनी तरुणीने आरोपीच्या बहिणीला पाठवलेले व्हॉट्सॲप मेसेज कुटुंबीयांच्या हाती लागले.
या मेसेजमध्ये छळ, मारहाण, धमक्या आणि मानसिक अत्याचाराचे तपशील असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर कुटुंबीयांनी सर्व पुरावे पोलिसांच्या ताब्यात देत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र गुन्हा नोंदवूनही आरोपीला अटक न झाल्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले. दरम्यान आरोपी कौशिक हा आपल्या काका असलेल्या अपक्ष उमेदवार अनंता पावशे यांच्या प्रचारात खुलेआम फिरत असल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं.
पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याने पीडितेचे नातेवाईक, परिसरातील महिला आणि नागरिक असे 40 ते 50 जण थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांना घेराव घालत तब्बल अर्धा तास जोरदार गोंधळ घालण्यात आला, अधिकाऱ्यांच्या गाड्याही अडवण्यात आल्या.
अखेर संतप्त वातावरण पाहता पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केलं असून चौकशीसाठी आरोपीच्या आईला ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे मात्र या घटनेमुळे कल्याण पूर्व परिसरात तणावाचं वातावरण असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.