Municipal Election : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा

Sangli Municipal Election Political Clash News : सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिरज येथे पैसे वाटपाच्या आरोपावरून राष्ट्रवादी अजित पवार व शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी हस्तक्षेप केला.
Sangli : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा
Sangli Municipal Election Political Clash Saam Tv
Published On
Summary
  • सांगली महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप

  • मिरज येथे राष्ट्रवादीच्या दोन गटांत वादावादी

  • आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर तणाव

  • पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

विजय पाटील, सांगली

राज्यात २९ महापालिकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारीला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकांचे प्रचार सुरु असून उद्या या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. असे असले तरी पक्षापक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरूच आहे. अशातच आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडीचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले.

निवडणूक काळात आचारसहिंता लागू असल्याने पैसे वाटणं किंवा मतदाराला कोणत्याही वस्तूंचे प्रलोभन दाखवण गुन्हा आहे. तरीही निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुप्तपद्धतीने पैसे वाटप सरार्स सुरु असते. ही एक लाजिरवाणी बाब आहे. मतदाराला विकत घेणं हा प्रकार सध्याच्या राजकारणातील ट्रेंड झाला आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत भाजपकडून ३००० हजारांची पाकीट वाटप करताना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले होते.

Sangli : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा
Maharashtra Dry Day : तळीरामांसाठी मोठी बातमी! उद्या पासून पुढील ४ दिवस दारू दुकाने बंद; नेमकं कारण काय ?

त्यानंतर आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडुन निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला,त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

यावेळी आमदार इद्रिस नायकवडी देखील उपस्थित होते. तर या वादावादी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले. दरम्यान मतदार याद्यांमधले असलेले घोळ,त्यामुळे मतदार यादीतील नावे आणि स्लिप बाबत नागरिकांनी आपल्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती,मात्र विरोधकांकडून या ठिकाणी येऊन नागरिकांना दमदाटी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com