Pune Police: पुण्यात वाहतूक पोलीस कर्मचारी संशयास्पद बेपत्ता, चिठ्ठीमुळे उडाली खळबळ

Talegaon Dabhade Traffic Police End Life: पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. वरिष्ठांच्या त्रासाला ते कंटाळले होते.
Talegaon Dabhade Traffic Police End Life:
saam tv
Published On

Summary -

  • पुण्यात वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झालेत.

  • वरिष्ठांकडून मानसिक छळ केल्याचा आरोप

  • नोटमध्ये धक्कादायक कारण सांगितलंय.

दिलीप कांबळे, मावळ

पुण्यामधील पोलीस खात्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झालेत. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे वाहतूक विभागात ते कार्यरत होते. वरिष्ठांना छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता ते संशायस्पदरित्या बेपत्ता झालेत. ते बेपत्ता झाल्यानंतर नोट सापडलीय. या नोटमध्ये त्यांनी वरिष्ठांनी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय. त्यांच्या नोटमुळे मोठी खळबळ उडालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, माधव केरबा डोके (३६ वर्षे) असं बेपत्ता झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. माधव डोके हे तळेगाव दाभाडे वाहतूक विभागात काम करत होते. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असावी असा शंका व्यक्त केली जात आहे. माधव डोके यांनी लिहिलेल्या नोटमुळे खळबळ उडालीय. वरिष्ठांच्या त्रासाला ते कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असावे असं म्हटलं जात आहे.

Talegaon Dabhade Traffic Police End Life:
Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

माधव डोके यांनी लिहिलेल्या नोटमध्ये वरिष्ठावर गंभीर आरोप केले आहेत. 'कर्तव्यावर असताना वारंवार पावती न फाडता गाड्या सोडत जा आणि संध्याकाळी मला येऊन भेटत जा. मी त्यांना नाही म्हणताच त्यांनी मला शिवीगाळ केली. वारंवार मानसिक छळ करीत आहेत. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात नो एन्ट्रीमध्ये 200 रुपये घेऊन त्यांच्या पोलीस गाडीच्या चालकाने गाड्या सोडल्या. एपीआय लोंढे यांच्यापुढे त्या पोलिसांना हजर केले असता ते म्हणाले ठीक आहे असे म्हणत पैसे घेऊन त्यांनी गाड्या सोडल्या.'

Talegaon Dabhade Traffic Police End Life:
Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

तसंच, 'एपीआय लोंढे यांनी मलाच शिवीगाळ केली. हा मनस्ताप मला सहन झाला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.', असे वाहतूक पोलीस माधव डोके यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे. माधव डोके यांची नोट पोलिसांना मिळाली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्यानं पुणे पोलीस दलात खळबळ उडालीय.

Talegaon Dabhade Traffic Police End Life:
Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com