धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

Husband Kills Wife Inside Police Station In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पोलिस ठाण्यातच नवऱ्याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणामुळे पोलिस सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Police personnel investigate the crime scene at Hardoi Police Station after a woman was shot dead by her husband.
Police personnel investigate the crime scene at Hardoi Police Station after a woman was shot dead by her husband.Saam tv
Published On

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, या ठिकाणी एका नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पोलिस ठाण्यात धडाधड गोळ्या झाडून ठार मारले. या घटनेमुळे परिसरात केवळ खळबळ उडाली नाही तर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Police personnel investigate the crime scene at Hardoi Police Station after a woman was shot dead by her husband.
Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

ही घटना हरदोईच्या पाली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. रामापूर अटारिया येथील रहिवासी अनूप यांचे १७ वर्षांपूर्वी सोनीशी लग्न झाले होते. ७ जानेवारी रोजी सोनी तिच्या नवऱ्याला सोडून तिचा प्रियकर सुरजीत शहजहानपूर येथील रहिवासी असलेल्या सोबत पळून गेली. मोठ्या शिताफीने पोलिसांनी काल महिलेला शोधून काढले आणि तीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बंद केले.

Police personnel investigate the crime scene at Hardoi Police Station after a woman was shot dead by her husband.
Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

या सगळ्याची माहिती तिच्या नवऱ्याला कळताच त्याने पोलीस स्टेशनजवळ पाहारा देण्यास सुरुवात केली. आणि आज सकाळी, सोनी जेवण करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये जात असताना तिच्या नवऱ्याने तिच्यावर बंदुकीने गोळीबार केला. यावेळी सोनी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Police personnel investigate the crime scene at Hardoi Police Station after a woman was shot dead by her husband.
Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पोलिस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी बंदूक शस्त्रे घेऊन प्रवेश करणे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या समोरच गोळ्या घालणे हे सुरक्षा व्यवस्थेतवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

आरोपी नवऱ्याला अटक, पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

घटनेनंतर पोलिसांनी आरोपी नवऱ्याला ताबडतोब बंदुकीसह अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या बायकोच्या फसवणुकीला कंटाळला होता आणि त्याला तिचा बदला घ्यायचा होता.

हरदोईचे पोलिस अधीक्षक एसपी अशोक कुमार मीणा यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की पोलिस ठाण्यातील सुरक्षेतील या त्रुटीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर कठोर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com