Sakshi Sunil Jadhav
रिलेशनशीपचे सध्या अनेक प्रकार व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आता फक्त लग्न करुन एका महिलेसोबत संसार करावा ही पद्धत राहीलेली नाही. त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
दक्षिण कोरियामधील घसरता जन्मदर सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरला होतो. यावर सरकारने एक अनोखा मार्ग निवडला. त्यामुळे तरुण-तरुणींना प्रेम, डेटिंग, लग्न आणि मुलं होण्यासाठी थेट पैसे दिले जात आहे.
लाइफस्टाइलच्या बदलामुळे आणि बिझी शेड्युअलमुळे लोकांना मुलं जन्माला घालायला वेळ मिळत नाहीये. दक्षिण कोरियाचा जन्मदर जगातील सर्वात कमी जन्मदरांपैकी एक झाला आहे. तरुण लग्न आणि कुटुंब टाळत असल्याने सरकार चिंतेत आहे.
कोरियामधील तरुण कामात इतके व्यस्त आहेत की डेटिंग, प्रेम किंवा लग्नासाठी वेळच उरत नाही. याचा थेट परिणाम लोकसंख्येवर होत आहे.
तरुण-तरुणींनी डेटवर जावं यासाठी सरकार थेट आर्थिक मदत देतं. ब्लाइंड डेटसाठी सुमारे ३५० डॉलर साधारण ३१ हजार दिले जातात.
रेस्टॉरंट, सिनेमा, फिरणं किंवा इतर कोणतीही ॲक्टिव्हिटीसचा सगळा खर्च सरकारकडून केला जातो.
डेटदरम्यान किंवा नंतर पालक भेटणार असतील, तर त्यासाठीही स्वतंत्र खर्च दिला जातो. सरकार नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देत आहे.
डेटचं नातं लग्नापर्यंत पोहोचल्यास त्या दाम्पत्याला थेट २५ लाख रुपये दिले जातात.
लग्नानंतर मुलं झाल्यास सरकारकडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य, बालसंगोपन खर्च आणि इतर सुविधा दिल्या जातात.
दक्षिण कोरियात राहणीमानाचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे तरुण स्वतःच्या करिअरला प्राधान्य देत आहेत, लग्नाकडे पाठ फिरवत आहेत.