कल्याण हादरलं! २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त, वसीम खानसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

107 kg Ganja Seized In Kalyan By Anti Narcotics Team: कल्याणमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई करत १०७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून तीन सराईत तस्करांना अटक करण्यात आली आहे.
Police display seized 107 kg of ganja worth ₹21.4 lakh after a major anti-narcotics operation in Kalyan.
Police display seized 107 kg of ganja worth ₹21.4 lakh after a major anti-narcotics operation in Kalyan.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा १०७ किलो गांजा जप्त केला असून तीन तस्करांना अटक केली आहे. वसीम खान उर्फ पिला, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Police display seized 107 kg of ganja worth ₹21.4 lakh after a major anti-narcotics operation in Kalyan.
अटकेची भीती दाखवून ७ लाख रुपये उकळले; पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ३ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड आणि उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांच्या पथकाने वाडेघर परिसरातील वाडेकर डम्पिंग ग्राउंडजवळ सापळा रचला. दरम्यान, संशयास्पद हालचाल करणारे तीन जण त्या ठिकाणी आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्या जवळ हिरव्या-पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळल्या.

Police display seized 107 kg of ganja worth ₹21.4 lakh after a major anti-narcotics operation in Kalyan.
Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं

त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. चौकशीदरम्यान आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता आणि शिताफी दाखवत धाडसी कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १०७ किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २१ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Police display seized 107 kg of ganja worth ₹21.4 lakh after a major anti-narcotics operation in Kalyan.
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय

या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा गांजा नेमका कुठून आणला, कोणाला विक्रीसाठी नेला जात होता आणि या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com