बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण; पाच जणांकडून जीवघेणा हल्ला

Attack On PSI In Beed: बीडमध्ये गस्तीदरम्यान एका मद्यधुंद टोळीने पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर फरार आहेत.
Attack On PSI In Beed
Police team investigates after a sub-inspector was attacked by a mob during night patrol in Beed’s Dharur area.
Published On
Summary
  • बीडच्या धारूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला

  • मद्यधुंद टोळक्याकडून मारहाण

  • कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपास सुरू

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडच्या धारूर शहराजवळ असलेल्या घाटपाटी परिसरात पोलिस उपनिरीक्षकावर झालेल्या हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर मद्यधुंद टोळक्याने थेट जीवघेणा हल्ला केला आहे. दगडफेकीत उपनिरीक्षक बाबासाहेब भवर थोडक्यात बचावले. धक्कादायक म्हणजे, या आरोपींमध्येच एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप केला जातोय.

Attack On PSI In Beed
Nasrapur Case: अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला; चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

“आम्हाला कोणी काही करू शकत नाही,” अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केलं. या टोळक्यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन जण फरार आहेत तर इतर आरोपी फरार आहेत. धारूर पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे. तर नेमकं पोलिसांवरच हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षितेचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com