Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय

Nasarapur Crime: पुण्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय
Nasarapur CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

  • पुणे आणि भोर वकिलांचा आरोपीला वकीलपत्र न देण्याचा निर्णय

  • आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

  • प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय

अक्षय बडवे, पुणे

नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे पुणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचं कुणीही वकीलपत्र न घेण्याचा भोरमधील वकिलांच्य बार असोसिएशनने निर्णय घेतला आहे.

अशा क्रूर गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही, असा ठराव भोर वकील संघटनेकडून करण्यात आला आहे. भोरनंतर पुण्यातल्याही वकील संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांनी दिली. घडलेल्या क्रूर घटनेचा निषेध म्हणून भोर आणि पुणे बार असोसिएशनचा एकही वकील या घटनेतील आरोपीचं वकील पत्र स्विकारणार नाही हे वकील संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलं आहे.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय
नसरापूर प्रकरणावरून संतापाचा आगडोंब; विकृताच्या कृत्याने प्रवीण तरडे भडकले, पोलिसांकडे केली मोठी मागणी

त्याचबरोबर भोर वकील संघटनेतर्फे या क्रूर गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आणि फिर्यादीला वकील संघटनेमार्फत १०० टक्के मदत करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने कोर्टासमोर मला एका किरकोळ हाणामारीच्या प्रकरणात अडकवलं असल्याचा आरोप केला आहे.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय
Nasarapur Crime: नसरापूरमध्ये ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नसरापूर प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'नसरापूरमध्ये दुदैवी घटना घडली. मलाही धक्का बसला. पीडित मुलीच्या कुटुंबाने पत्र दिले होते. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात आणि स्पेशल कोर्ट नेमून चालवणार आहे. आम्ही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार आहोत. त्यांनी मला लेखी पत्र दिले होते त्यांना आश्वासन दिले आहे.'

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय
Nasarapur Case: कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा, नसरापूर प्रकरणातील आरोपीचा हादरवून टाकणारा चेहरा समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com