Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेनंतर बाबा भोले पहिल्यांदाच माध्यमांसमोर; मुख्य आरोपी कोर्टासमोर हजर होणार; १०० हून अधिक लोकांचा बळी

Uttar Pradesh Police Arrested Main Organiser Of Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला अटक केली आहे.
 हाथरस दुर्घटना
Hathras StampedeSaam Tv
Published On

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये एक मोठी अन् महत्वाची अपडेट समोर आलीय. या दुर्घटनेमध्ये १०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. परंतु दुर्घटना झाल्यापासून बाबा भोलेनाथ अज्ञातवासात होते, तर या घटनेतील मुख्य आयोजक फरार होता. परंतु आता या दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलीय, तर बाबा भोलेनाथ पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आलेत.

हाथरस दुर्घटनेनंतर बाबा भोलेनाथ काय म्हणाले?

हाथरस प्रकरणात (Uttar Pradesh) १०० हून अधिक लोकांचा बळी गेल्यापासून अज्ञातवासात असलेला बाबा भोलेनाथ पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आलाय. आम्ही २ जुलैला घटनेनंतर खुप दुःखी असल्याचं बाबा भोलेनाथने म्हटलंय. सर्वांनी शासनावर विश्वास ठेवावा. जे या प्रकरणात दोषी असतील, त्यांना सोडलं जाणार नाही. मृत परिवाराच्या लोकांना मदत केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं (Hathras Stampede) आहे.

सत्संगाच्या मुख्य आयोजकाला अटक

हाथरस दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. हाथरस दुर्घघटनेतील प्रमुख आरोपी देवप्रकाश याला पोलिसांनी रात्री अटक (Hathras Stampede Update) केली. दुर्घटनेनंतर सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर फरार होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एक लाख रूपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. परंतु देवप्रकाशने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

 हाथरस दुर्घटना
UP Hathras: हाथरसच्या चेंगराचेंगरीत 120 जणांचा बळी; सत्संगातील चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?

हाथरस दुर्घटनेत नक्की काय घडलं?

सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर उत्तर प्रदेशमधल्या सलीमपुर गावचा रहिवाशी आहे. देवप्रकाश हा भोले बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती (Baba Bholenath) मिळतेय. हाथरस येथे मंगळवारी (ता. ३ जुलै) दुपारच्या सुमारास भोलेबाबांच्या सत्संग कार्यक्रमात भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये ११६ जणांनी जीव गमावला तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

 हाथरस दुर्घटना
Hathras Stampede Update: स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com