भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
हाथरसमधील सत्संगात चेंगराचेंगरीने120 पेक्षा अधिक भाविकांचा जीव गेलाय. त्यामुळे हाथरसमधील दुर्घटनेला जबाबदार कोण? चेंगरा चेंगरीचे बळी रोखण्यासाठी उपाय काय? यावरचा हा विशेष रिपोर्ट. उत्तर प्रदेश हाथरसमधील सिकंदररावमध्ये नारायण साकार हरी ऊर्फ भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरीचा धक्कादायक प्रकार घडलाय. या दुर्घटनेत महिला आणि बालकांसह तब्बल 120 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. तर शेकडो लोक जखमी झालेत. कशामुळे एवढ्या लोकांचा बळी गेला ते पाहूयात.
हाथरसमधील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम
हाथरसमध्ये नारायण साकार हरीचा सत्संग होता. सत्संगासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. कथाकारांना भेटण्यासाठी आलेल्या भाविकांना स्वयंसेवकांनी रोखलं. त्यावेळी कडक ऊन आणि आर्द्रतेमुळे भाविकांनी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गर्दी हाताळण्यात स्वयंसेवकांना अपयश आलं आणि अचानक गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात महिला, मुलं आणि 1 पुरुषाचा मृत्यू झाला.
भोला बाबा जिथं पाय ठेवतो ती माती पवित्र असल्याची भक्तांची भावना होती. त्यातच बाबाने जिथं पाय ठेवला ती माती आपल्या घरी नेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवताना सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या चुकीमुळे चेंगरा चेंगरी झाल्याचा अहवाल चौकशीनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. मात्र विरोधी पक्षाने सत्संग आयोजित केलेल्या बाबालाही आरोपी करण्याची मागणी केलीय. हाथरससारख्या घटना महाराष्ट्रातही घडल्या आह
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी चेंगराचेंगरीत 14 लोकांचा मृत्यू झाला होता.
2005 मध्ये मांढरदेवी दुर्घटनेत 340 लोकांचा मृत्यू झाला होता.
27 ऑगस्ट 2003 मध्ये कुंभ मेळ्यात झालेल्या दुर्घटनेत 39 लोकांचा मृत्यू झाला होता.
सत्संग असो वा कुठल्याही धार्मिक कार्यक्रम. या कार्यक्रमात खबरदारी घेण्याची गरज आहे,मात्र एवढ्या घटना घडल्यानंतरही यातून ना आयोजक धडा घेतात ना अनुयायी.आणि वारंवार बळी जात राहतात. आता हाथरसच्या घटनेतून तरी बोध घेतील अशी अपेक्षा..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.