Hathras Stampede Update: स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?

Why Was the Bhole Baba in Hathras Stampede Case Got Arrested: हाथरसमध्ये ज्या भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती, त्या बाबाने १९९८ मध्ये मृत मुलीला जिवंत करण्याचा दावा केला होता. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती.
Hathras Stampede Update: स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?
Bhole Baba in Hathras Stampede CaseSaam Digital

हाथरसमधील नारायण साकार हरी भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा बळी गेला आहे. यानंतर भोले बाबा फरार झाला असून मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. याच भोले बाबाने काही वर्षांपूर्वी मृत मुलीला जिवंत करण्याचा दावा करत स्मशानभूमीत गोंधळ घातला होता. या दाव्यावरून त्याची पत्नी आणि त्याच्या ४ अनुयायांना १९९८ मध्ये अटक करण्यात आली होती.

Hathras Stampede Update: स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?
Hathras Stampede: भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी; कोण आहेत नारायण साकार हरी भोले बाबा

नारायण साकार विश्व हरी भोले बाबा, त्यांची पत्नी आणि इतर चार जणांनी 1998 मध्ये आग्रा येथील मृत मुलीचं पुनरुत्थान करण्यासाठी त्यांच्याकडे जादुई शक्ती असल्याचा दावा केला, होता त्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. शाहगंजचे एसएचओ तेजवीर सिंग म्हणाले की, या प्रकरणात एका १६ वर्षीय मुलीचं कर्करोगाने निधन झालं होतं. मात्र भोले बाबाने तिला पुन्हा जिवंत करू शकतो, असा दावा केला होता. त्याच्या अनुयायांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला होता. आयपीसी कलम 109 आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

भोले बाबाने त्यांची भाची दत्तक घेतली होती. तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. एका दिवशी ती बेशुद्ध पडली होती. यावेळी भोले बाबाने तिला जिवंत करण्याचा दावा केला. त्याच्या दाव्यानंतर काही वेळातचं ती मुलगी शुद्धीवर आली होती पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला होता. सूरजपाल 200 हून अधिक लोकांसह स्मशानभूमीत पोहोचला आणि त्या मुलीला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं, असं कुटुंबीयांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी बळजबरीने मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर भोले बाबाच्या अनुयायांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि सूरजपाल, भोले बाबाची पत्नी आणि चार अनुयायांना अटक केली होती, अशी माहिती शाहगंजचे एसएचओ तेजवीर सिंग यांनी दिली.

Hathras Stampede Update: स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?
Hathras stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार, आयोजकांवर गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com