Hathras stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार, आयोजकांवर गुन्हा

Hathras stampede News : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे.
हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार, आयोजकांवर गुन्हा
Hathras stampedeSaam tv
Published On

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जवळील रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पडला आहे. तर मृतांच्या जवळच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. तर भोले बाबा फरार असल्याची माहिती मिळत आहे.

हाथरस दुर्घटनेप्रकरणी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत कार्यक्रमाच्या २२ आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा उर्फ सुरजपाल फरार झाल्याची माहिती मिळत आहे.

हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार, आयोजकांवर गुन्हा
Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढला; रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंचाळ्या

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ८० हजार लोकांची परवानगी आयोजकांनी घेतली होती. मात्र या कार्यक्रमाला अडीच लाखांपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. पोलिसांनी बाबाच्या मैनपुरी येथील आश्रमाची तपासणी सुरू केली आहे. या आश्रमाच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. हाथरस दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वर पोहोचली आहे. 28 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. या जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

हाथरस घटनेवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हाथरस घटनेवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वकील विशाल तिवारी यांनी याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी तयार करून तपास करावा, अशी याचिकेतून मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सगळ्या राज्यांना निर्देश दिले जावेत, असेही याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हाथरसमध्ये पोहोचले आहेत. काही वेळातच दोघे घटनास्थळाला भेट देणार आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील लखनऊहून निघाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com