Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढला; रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंचाळ्या

Hathras Stampede News : या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Hathras Stampede News
Hathras Stampede NewsSaam TV
Published On

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी (ता. ३ जुलै) दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. भोलेबाबांच्या सत्संग कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Hathras Stampede News
UP Hathras Stampede : मृतांचा खच पाहून आला हृदय विकाराचा झटका, ऑन ड्युटी पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू

मृतांमध्ये लहान मुले, महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. परिस्थिती इतकी भयानक आहे, की रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच लागला आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोश आणि किंचाळ्यामुळे संपूर्ण देश हादरवून गेला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

अलिगडचे पोलीस कमिशर (Police) यांना दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यास सांगितलं आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आल आहे.

हाथरसमधील घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमधील (Uttar Pradesh) फुलरई मुगलगढी येथे सरकार नारायण विश्व हरी भोले बाबा यांच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला लाखोंची गर्दी झाली होती. बाबांचं प्रवचन संपल्यानंतर पदस्पर्ष दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आणि त्यातून ही चेंगराचेंगरी झाली, असं सांगण्यात येत आहे.

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखडी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com