Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप

MLA Mahendra Thorave: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर एका वकिलाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. हा वकील गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. पण आमदार थोरवे यांनी आरोपाचे खंडन केले.
Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप
Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • कर्जत येथील तृशांत आरडे हे वकील ३ महिन्यांपासून बेपत्ता

  • वकिलाच्या पत्नीने शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले

  • आमदार थोरवे यांनी आरोपांचे खंडन केले

  • थोरवेंनी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा दिला इशारा

सचिन कदम, रायगड

कर्जत येथील आरडे वकील बेपत्ता प्रकरणाला नवं वळण आले आहे. आरडे वकिलांच्या पत्नी किशोरी आरडे यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंगळवारी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेत किशोरी आरडे यांनी महेंद्र थोरवेंवर आरोप केले. पण किशोरी आरडे यांनी केलेल्या आरोपांचे महेंद्र थोरवे यांच्याकडून खंडन करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप खोटे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra Politics : पुण्यात शरद पवारांना दुहेरी धक्का, दोन दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथील तृशांत आरडे हे वकील जुलै महिन्यापासून बेपत्ता झाले आहे. आरडे वकील बेपत्ता होण्यामागे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप किशोरी आरडे यांनी केला. आमदार थोरवे यांच्याविरोधात आरडे वकील यांनी अनेक न्यायालयीन खटले चालवल्याने आरडे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाला असल्याचे किशोरी आरडे यांचे म्हणणे आहे.

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

'आमच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, माझ्या पतीला शोधून आणा, माझे बेपत्ता पती आणि माझ्या जीवाला धोका आहे, पोलिस सहकार्य करत नाहीत, आम्हाला न्याय द्या.' असे मत किशोरी आरडे यांनी व्यक्त केले. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. आरडे वकील कोण हे मी ओळखत नाही. माहिती घेतली असता या माणसांने ॲट्रॉसिटीच्या अनेक खोट्या केसेस केल्या आहेत.'

तसंच, 'त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरडे वकील फरार झाले आहेत. तुमचे मत भेद मिटवा.' असं आवाहन थोरवे यांनी किशोरी आरडे यांना केले आहे. सोशल मिडियावर बदनामी केली तर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार थोरवे यांनी आरडे कुटुंबीयांना दिला आहे.

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com