Palash Muchhal : पलाश मुच्छलवर सांगलीत गुन्हा दाखल, पोलिस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, नेमकं प्रकरण काय?

Palash Muchhal : सांगलीत पलाश मुच्छल यांच्यावर फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. निर्माता विज्ञान माने यांची तक्रार; मुच्छलने आरोप फेटाळून 10 कोटींचा बदनामी दावा दाखल केला.
Palash Muchhal
Palash MuchhalSaam tv
Published On

Palash Muchhal : प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्याविरोधात सांगलीत आणखी एक तक्रार दाखलं करण्यात आली आहेय फसवणूक आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही तक्रार भारतीय महिला क्रिकेटपट्टू स्मृती मानधनाच्या सांगलीतील बालमित्र आणि अभिनेता व निर्माता विज्ञान माने याने दाखल केली आहे. त्याच्या आरोपानुसार, पलाश मुच्छलने “नजरिया” या चित्रपटासाठी गुंतवणुकीचे आश्वासन देत त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. मात्र, संबंधित प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप माने यांनी केला आहे.

Palash Muchhal
Trisha Krishnan: त्रिशाला व्हायचंय मुख्यमंत्री; १२ वर्षांपूर्वीच व्यक्त केली इच्छा,थलपती विजय यांचे चाहते म्हणाले 'पुढची जयललिता'

या आर्थिक वादासोबतच, विज्ञान माने यांनी अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) कायद्यांतर्गतही तक्रार नोंदवली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, या प्रकरणात त्याच्याशी अन्यायकारक वर्तन करण्यात आले असून त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Palash Muchhal
Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वत:च पेटवून घेतलं? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य काय? - Fact Check

दरम्यान, पलाश मुच्छल याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने आपल्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे सांगत, ही बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्याने तक्रारदाराविरोधात १० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com