Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वत:च पेटवून घेतलं? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य काय? - Fact Check

Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वतःला पेटवून घेतल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. मेट गाला 2026 दरम्यान सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओचे नेमकं सत्य काय जाणून घेऊयात.
Famous Singer katy perry Fire Herself
Famous Singer katy perry Fire HerselfSaam Tv
Published On

Actress Fire Herself: हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका केटी पेरी हिचा सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मेट गाला 2026 दरम्यान कॅटी पेरीने स्वतःला पेटवून घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त केली आणि हा स्टंट असल्याचीही चर्चा सुरू झाली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला. काही युजर्सनी “कॅटी पेरीने ड्रेसला आग लावली” असा दावा करत पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे अनेक चाहते घाबरले. Met Gala 2026 सारख्या भव्य कार्यक्रमात कलाकार वेगळे प्रयोग करतात, त्यामुळे सुरुवातीला अनेकांना हा फॅशन स्टंट वाटला होता.

Famous Singer katy perry Fire Herself
Trisha Krishnan: त्रिशाला व्हायचंय मुख्यमंत्री; १२ वर्षांपूर्वीच व्यक्त केली इच्छा,थलपती विजय यांचे चाहते म्हणाले 'पुढची जयललिता'

हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकरी कमेंट करुन चिंता व्यक्त करत आहेत. एकाने लिहीले, मला विश्वासच बसत नाहीये ही खरी आग आहे! ती ठीक आहे का? तर आणखी एकाने लिहिले, आग लावताना ती काय विचार करत होती?, दुसऱ्याने लिहीले, स्वत:चा जीव जास्त महत्वाचा असतो असा स्टंट करण्यापेक्षा

Famous Singer katy perry Fire Herself
Sreeleela Controversy: महिला मासिक पाळीचा बहाणा देऊन काम टाळतात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून नवा वाद

फॅक्ट-चेकनुसार, कॅटी पेरीने मेट गालामध्ये स्वतःला पेटवून घेतलेलं नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा प्रत्यक्षात तिच्या आधीच्या एका शूटिंगमधील किंवा म्युझिक व्हिडिओमधील फायर स्टंटचा भाग आहे.

मेट गाला 2026 मध्ये कॅटी पेरीने पूर्णपणे वेगळा लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि सिल्व्हर मास्क परिधान केला होता, ज्यामुळे ती रेड कार्पेटवर वेगळ्याच अंदाजात दिसली. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ हा तिच्या आधीच्या शूटचा असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com