Sreeleela Controversy: महिला मासिक पाळीचा बहाणा देऊन काम टाळतात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून नवा वाद

Sreeleela Controversy: अभिनेत्री श्रीलीलाच्या “मासिक पाळीचं कारण देऊ नका” या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. तिच्या विधानावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sreeleela Controversy
Sreeleela ControversySaam tv
Published On

Sreeleela Controversy: गेल्या महिन्यात, 'उस्ताद भगत सिंग' या चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्री श्रीलीला हिने तिच्या मासिक पाळीबद्दल (Periods) एक विधान केले. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. या अभिनेत्रीने असे म्हटले होते की, मासिक पाळी सुरू असतानाही तिने काम करणे सुरूच ठेवले; कारण काम करण्यासाठी मासिक पाळीचे कारण कोणी देऊ नये. नेमक्या याच विधानामुळे वाद निर्माण झाला आणि ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. तथापि, हे विधान ज्या सोशल मीडिया पेजवर मूळतः अपलोड करण्यात आले होते, तिथून ते नंतर काढून टाकण्यात आले.

श्रीलीला काय म्हणाली?

या कार्यक्रमादरम्यान, श्रीलीला म्हणाली, "माझी सर्व गाणी प्रेक्षकांना आवडली आहेत. पसंतीस उतरली आहेत. मासिक पाळी सुरू असतानाही मी अनेक सीन्स शूट केले आहेत. त्यामुळे, मासिक पाळी हे काम न करण्याचे कारण असू शकतं नाही. म्हणूनच, मानसिक असो वा शारीरिक त्रास यापैकी कोणताही घटक हे काम न करण्याचं कारण ठरू शकत नाही."

Sreeleela Controversy
Asha Bhosle Health Update: आशा भोसलेंची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

श्रीलीलावर ट्रोलिंग

या विधानामुळे, श्रीलीलावर नेटकरी ट्रोलिंग करत आहे. एकाने कमेंट केली तू मुलगी असून असं कसं बोलते, आणखी एकाने कमेंट केली तुला माहिती आहे ना प्रत्येक मुलगी वेगळी आणि प्रत्योक मुलीला होणारा त्रास हा वेगळा असतो. एक म्हणाली आणि ज्यांना PCOS असतं ते देखील कारणं देतात का?

Sreeleela Controversy
Actress Divorce: लग्नाच्या १४ वर्षांचा संसार मोडला; अभिनेत्रीने घेतली नाही पोटगी, एक्स पतीवर केले गंभीर आरोप

या चित्रपटांमध्ये दिसणार श्रीलीला

कामाबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलीला आता अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. हा एक रोमँटिक-म्युझिकल चित्रपट आहे. याव्यतिरिक्त, धनुषची मुख्य भूमिका असलेल्या एका आगामी तमिळ प्रकल्पाचाही ती भाग आहे. राजकुमार पेरियासामी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ममूटी आणि साई पल्लवी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com