Actress Divorce: लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री डेलनाझ इराणीने अलीकडील एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा आणि मोठा खुलासा करत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. एक्स पती राजीव पॉलसोबत झालेल्या घटस्फोटाबाबत बोलताना तिने अनेक भावनिक आणि धक्कादायक खुलासे केले.
डेलनाझ आणि राजीव यांनी १९९८ साली लग्न केले होते. मात्र, १४ वर्षांच्या संसारानंतर २०१० मध्ये ते वेगळे झाले आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट कायदेशीररित्या पूर्ण झाला. विशेष म्हणजे, घटस्फोटानंतर डेलनाझने पोटगी (alimony) मागितली नाही. यामागे कोणताही आर्थिक मुद्दा नसून, मानसिक शांततेला प्राधान्य देण्याचा तिचा निर्णय होता.
'द मेल फेमिनिस्ट’ या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डेलनाझने सांगितले की, तिच्या नात्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे तिला ‘गृहीत’ धरणे. तिच्या मते, राजीव पॉलने कधीच तिचे मनापासून कौतुक केले नाही. “नात्यात व्यक्ती एकमेकांना गृहीत धरू लागतात आणि माझ्याबाबतीतही हेच घडले,” असे ती म्हणाली.
तिने पुढे सांगितले की, घटस्फोट हा तिच्यासाठी अत्यंत कठीण अनुभव होता. मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातून आलेल्या डेलनाझच्या आयुष्यात ‘घटस्फोट’ हा शब्द कधीच नव्हता. त्यामुळे या निर्णयामुळे तिला दीर्घकाळ मानसिक त्रास सहन करावा लागला. तिने वैवाहिक आयुष्यातील समस्या आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवल्या होत्या. तिच्या वडिलांच्या आजारपणामुळे ती त्यांना कोणताही मानसिक त्रास द्यायचा नव्हता.
डेलनाझने स्पष्ट केले की, तिला घटस्फोटातून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. “मला काहीच मिळाले नाही. पण मी माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला,” असे ती म्हणाली. दरम्यान, सध्या डेलनाझ इराणी डीजे पर्सी करकरियासोबत रिलेशनशिपमध्ये असून गेल्या अनेक वर्षांपासून ते एकत्र आहेत. दुसरीकडे, राजीव पॉल अजूनही सिंगल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.