Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं

Father Killed Daughter In Daund: दौंडमध्ये वडिलांनी ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. मुलीने रिझल्टवर खाडाखोड केल्याच्या रागातून त्याने हे भयंकर कृत्य केले. लाकूड कापायच्या मशीनने तिच्यावर सापसप वार केले.
Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं
Pune CrimeSAAM TV
Published On

Summary -

  • पुण्यातील दौंड तालुक्यात वडिलांकडून मुलीची हत्या

  • रिझल्टवर खाडाखोड केल्याच्या रागातून केली हत्या

  • लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीवर सपासप वार करण्यात आले

  • हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू

  • पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये वडिलांनी पोटच्या मुलीचा जीव घेतला. शाळेच्या रिझल्टवर खाडाखोड केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीवर लाकूड कापण्याच्या मशीनने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजे या गावामध्ये राहणाऱ्या शांताराम दुर्योधन चव्हाण (३३ वर्षे) या तरुणाने मुलीची हत्या केली. अनामिका चव्हाण (९ वर्षे) असं हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ३ मे रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अनामिकाने आपल्या भावाच्या रिझल्टवर खाडाखोड केली होती. त्यामुळे तिचे वडील शांताराम संतप्त झाले होते. याच रागातून शांतारामने टोकाचा निर्णय घेत अनामिकाला संपवलं.

Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं
Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणावर भरचौकात जीवघेणा हल्ला, डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह रुग्णालयात पोहचला; थरारक VIDEO

आरोपीने लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनामिकाचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या अमानुष कृत्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावली. जेणेकरून हा प्रकार अपघात असल्याचे भासवता येईल.

Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या चिंगु शिंदबाद भोसलेने देखील ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तिने कोणालाही माहिती देऊ नये असे सांगून पोलिसांपासून सत्य दडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात कोयत्याने सपासप वार, नंतर दगडाने ठेचून तरुणाची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com