अटकेची भीती दाखवून ७ लाख रुपये उकळले; पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ३ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

pune police officer dismissed : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
pune police officer dismissed News
pune police officer dissmissed Saam tv
Published On
Summary

पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

लाचखोरी प्रकरणात 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ

३ पोलिसांना बडतर्फ केल्याने पोलीस दलात खळबळ

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील पोलीस दलातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. ३ पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खंडणी प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे आणि कर्मचारी सुदाम तायडे असे बडतर्फ केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तिघेही शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

pune police officer dismissed News
Pune news: बायको मिळावी म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; पोलीस असल्याचे खोटे फ्लेक्स लावले...आता खरे पोलीस मागावर

पुण्यातील प्राचार्यांना अटकेची भीती दाखवत तिघांनी तब्बल ७ लाख रुपये उकळले होते. प्राचार्यांनी पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे आणि कर्मचारी सुदाम तायडे या तिघांवर आरोप केला होता. तिघांनी मिळून संबंधित प्राचार्यांना गुन्ह्यात अडकवण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवली. आता याच प्रकरणात पोलीस विभागाने तिघांवर मोठी कारवाई केली. कारवाईमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुण्यातील २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. लाचखोर प्रकरणात दोघांवर कारवाई करण्यात आली. एपीआय वैशाली तोटेवार आणि पीएसआय मनोज बरूरे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर आज मंगळवारी दोघांनाही पुणे शहर पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. यो दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लाच घेताना अटक करण्यात आली.

pune police officer dismissed News
पुण्यातील इमारतीत चालायचा भलताच प्रकार; पोलिसांनी मध्यरात्री टाकला छापा, १५ बांगलादेशींसह महिला अन् पुरुष ताब्यात

वैशाली तोटेवारांना १ मे रोजी पोलिस निरीक्षक, लोहमार्ग, मुंबई या पदावरून रूजू होण्यासाठी पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यात आलं होतं. तोटेवार यांनी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून कोंडऱ्याड हॉटेलच्या परिसरात २७ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. तुमची बेईमानी वृत्ती येते, असं म्हणत पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी त्यांना निलंबित केलं. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे ८० हजारांची लाच स्वीकारताना पकडले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com