Pune news: बायको मिळावी म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; पोलीस असल्याचे खोटे फ्लेक्स लावले...आता खरे पोलीस मागावर

Fake police officer: पुण्यात एका तरुणाने लग्नासाठी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत शहरभर फ्लेक्स लावले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pune news
Pune newsSAAM TV
Published On

पुण्यात एक धक्कादायक पण विनोदी घटना घडली आहे. एका तरूणाचं लग्न होत नव्हतं म्हणून त्याने थेट पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून मुलींवर प्रभाव पाडल्याचं प्रकरण समोर आलंय. मुख्य म्हणजे आपली पुणे शहराच्या पोलीसमध्ये निवड झाल्याचे फ्लेक्स लावलेत.

खोटा दावा करत लावले प्लेक्स

पुण्यातील नऱ्हे रोडजवळ राहणारा ऋषिकेश राजू जाधवने हे कृत्य केलं आहे. २६ वर्षीय ऋषिकेशने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाली असा खोटा दावा करत शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स लावलेत. या फ्लेक्समुळे परिसरात काही काळ चर्चेचा विषय निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं.

Pune news
Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवले वर्दीतले फोटो

दरम्यान हा तरूण इतक्यावरच थांबवा नाही. त्याने पोलीसांची वर्दी घालून काही फोटो काढून घेतले आणि हेच फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवले होते. लोकांमध्ये इम्प्रेशन पाडण्याचा त्याचा विचार होता. असं करून ओळखीच्या लोकांमध्ये आणि मुलींमग्ये स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं दाखवत लग्नासाठी प्रस्ताव मिळवण्याचा त्याचा डाव होता.

पोलिसांनी केली चौकशी सुरु

दरम्यान त्याचा हा डाव जास्त दिवस लपून राहू शकला नाही. यावेळी काही जणांना संशय आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. यावेळी तरूणीने रचलेला बनाव त्यांच्या समोर आला. सध्या हा तरूण पोलिसांच्या रडारवर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लग्न जमत नसल्यामुळे या तरूणाने हा मार्ग निवडल्याचं समोर आलंय. आपण पोलीस झालो तर मुलींवर त्याचा प्रभाव पडेल आणि लग्न जमेल असा त्याने विचार केला होता. मात्र पोलिसांना हा प्लॅन समजला आणि तो पूर्णपणे फसला.

Pune news
Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

दरम्यान या प्रकाराची गंभीर दखल घेत नऱ्हे पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com