JEE Mains Result: डोबिंवलीचा लेक राज्यात पहिला, जेईईमध्ये ९९.९९ टक्के मिळवले

JEE Mains Result 2026: जेईई मेन्स परीक्षेचा काल निकाल लागला. या परीक्षेत डोबिंवलीच्या हेत देवरा महाराष्ट्रातून पहिला आला आहे. त्याने परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवले आहे.
JEE Mains Result
JEE Mains ResultSaam Tv
Published On
Summary

जेईई मेन्स परीक्षेचा निकाल लागला

डोबिंवलीचा हेत देवरा महाराष्ट्रात पहिला

परीक्षेत मिळवले ९९.९९ टक्के गुण

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी जाहीर केलेल्या JEE मेन्स २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. जेईई ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी आहे. जेईई मेन्स परीक्षेत डोंबिवलीच्या हेत आशिष देवरा याने 99.99 टक्के गुण मिळवले आहे. हेत देवरा यांने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळला आहे. हेतच्या या कामगिरीचे डोंबिवलीकरांना विशेष कौतुक आहे.

JEE Mains Result
Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव, वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास

यंदा देशभरातून सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी (JEE Main) ही परीक्षा दिली. अत्यंत स्पर्धात्मक आहे. या परीक्षेत हेत देवरा याने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर 99.99 टक्के गुण मिळवले.

अभियांत्रिकी शिक्षणासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.इंजिनियर होण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास केल्यानंतरच चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळते. हेतच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डोंबिवलीतील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडूनही त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

हेतने नियमित अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मॉक टेस्टचा सातत्याने सराव यावर भर दिल्याचे सांगितले. आता उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.

हेतने सांगितला अभ्यासाचा दिनक्रम

हेते आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. तो म्हणाला की,मी रोज ठराविक तास अभ्यास केला. सोशल मीडियापासून थोडा दूर राहून पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. माझ्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. पुढे चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे,असे हेतने सांगितले.

JEE Mains Result
Success Story: सलग दोनदा UPSC क्रॅक; इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता 3 इडियट्सचा प्रश्न; IPS मोहन शक्ती अवस्थी आहेत तरी कोण?

हेतच्या कुटुंबियांना आनंद

हेतने खूप मेहनत घेतली. आम्ही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले. त्याच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. पुढील शिक्षणासाठी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहोत.असे हेत देवराच्या वडिलांनी सांगितले हेत देवरा यांच्या या घवघवीत यशामुळे डोंबिवलीकरांचा अभिमान वाढला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे.

JEE Mains Result
Success Story: जिद्द! काम करता करता केला अभ्यास; तीनदा अपयश; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IFS पूज्य प्रियदर्शिनी यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com