Gondia Accident News : भीषण कार अपघातात नागपूरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी ठार

या अपघाताची माहिती कळताच पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहचले.
gondia news,
gondia news, saam tv

Gondia News : भरधाव वेगाने जात असलेली चारचाकी कार अनियंत्रित होवुन रस्त्याचे बाजुला असलेल्या शेतात जावुन कोसळल्याने कारमधे बसलेला युवक गाडीतुन 60 ते 70 फुटांवर जावुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव- नवेगांवबांध मार्गावर पेट्रोल पंप परिसरात घडली आहे. (Maharashtra News)

gondia news,
Subhedar Ajay Dhagale News : अमर रहे...अमर रहे... हुतात्मा सुभेदार अजय ढगळे अमर रहे... मोरवणेत भावपुर्ण वातावरण

यामधे डेव्हिड धनराज रहिले (वय 19 राहणार इंजोरी, हल्ली मुक्काम अर्जुनी मोर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर वैभव उमेश राजाभोज हा कार चालक युवक किरकोळ जखमी झाला आहे.

gondia news,
Saam Impact : ...अन् नंदुरबारचे प्रशासन खडबडून जागे झाले; 'साम टीव्ही' च्या बातमीची घेतली दखल

या भीषण अपघातात ठार झालेला युवक नागपुर येथे प्रियदर्शनी अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षणास होता. ताे तीन दिवसापूर्वीच अर्जुनी मोरगावला आला होता. गावातीलच त्याचा मित्र वैभव उमेश राजाभोज आणि डेव्हिड हे भेटले.

त्यांनी अर्जुनी मोरगाव -नवेगांवबांध मार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तिथुन भरधाव वेगाने नवेगांवबांधकडे जात असताना गाडीवरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरच्या दिशादर्शक फलक तोडुन शंभर फुट चारचाकी उलटत गेली.

gondia news,
Sangli : देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर टॅक्सी चालक-मालक नाराज, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला माेर्चा

या गाडीतुन डेव्हीड हा फुटबॉल प्रमाणे गाडीपासुन 60 ते 70 फुटांवर जावुन पडला व जागीच ठार झाला. या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना ग्रामस्थांनी दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com